राज्य सरकारचा मोठा निर्णय! मानखुर्दमध्ये उभारणार भव्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन

    13-Aug-2024
Total Views |
 
Lodha
 
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मृतीभवन उभारण्यात येणार आहे. मानखुर्दच्या महिला व बालविकास विभागाच्या जागेवर हे स्मृतीभवन साकारले जाणार आहे.
 
मुंबईतील मानखुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन उभारण्यात येणार असून राज्य सरकारतर्फे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबद्दलची घोषणा केली. साधारणपणे तीन लाख स्वेअर फूट क्षेत्राच्या या बांधकामासाठी ४७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  "संजय राऊतांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाचा अपमान केलाय!"
 
आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे भवन बनणार असून त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा राहिल. याशिवाय २०० पेक्षा जास्त लोकांसाठी सभागृह आणि विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील सर्व महिला बाल विकासासंदर्भातील सर्व कार्यालये एका छताखाली येणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त आणि भव्य असे स्मृतीभवन पहिल्यांदाच भारतात उभे राहणार आहे, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली आहे.