"ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या..."; बावनकुळेंचे जोरदार प्रत्युत्तर

    31-Jul-2024
Total Views |
 
Bawankule & Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या भरवश्यावर फडणवीसांना पाहून घेण्याची भाषा करत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना तुमची ही भाषा ऐकून काय वाटलं असेल, याचा विचार करा. तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणूकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत. हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लीम मतांच्या भरवश्यावर तुम्ही बोलत आहात."
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरे नाक्यावरच्या..."; दरेकरांचा खोचक टोला
 
"देवेंद्रजी हे या राज्याला विकासाकडे नेणारं नेतृत्व आहे. महाराष्ट्राच्या जनतेने तुमची मानसिक दिवाळखोरी समजलेली आहे. तुम्ही जातीपातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मत देण्याची भाषा करत आहात. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. तुम्ही ज्या स्तरावर उतरले आहात त्यामुळे तुम्हाला जनता मतांच्या रुपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही," अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे.