गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांना काँग्रेसचा विरोध!

    19-Jul-2024
Total Views | 46

MP Congress

मुंबई (प्रतिनिधी) : (Congress Gurupornima News) 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. त्यानिमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. काँग्रेसने मात्र यास धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली विरोध दर्शविला आहे.

हे वाचलंत का? : आसाममध्ये मुस्लीम विवाह, घटस्फोट नोंदणी कायदा रद्द

मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, २० जुलै रोजी प्रार्थनेनंतर शिक्षक गुरुपौर्णिमा आणि गुरु-शिष्य परंपरेच्या महत्त्वावर भर देतील. यानंतर प्राचीन काळी प्रचलित असलेली गुरुकुल पद्धत आणि त्याचा भारतीय संस्कृतीवर होणारा परिणाम यावर निबंध लेखन होईल. २१ जुलै रोजी शाळांमध्ये सरस्वती वंदना, गुरु वंदना, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात येतील. यावेळी गुरु व शिक्षकांचा गौरव करण्यात येईल. यासोबतच संबंधित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि शाळेतील माजी विद्यार्थ्यांनाही या कालावधीत बोलावण्यास सांगण्यात आले आहे.

काँग्रेसने मात्र शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशाला विरोध केला आहे. राज्य काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज यांच्या म्हणण्यानुसार ते धर्मनिरपेक्षतेच्या भावनेच्या विरुद्ध आहे, जो संविधानाचा अविभाज्य भाग आहे. ते म्हणाले, 'भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, जिथे सर्व धार्मिक समुदायातील विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकतात. म्हणून शाळांमध्ये कोणत्याही एका धर्माशी संबंधित कोणतीही नवीन परंपरा सुरू केल्याने वाद निर्माण होऊ शकतो. जर एका धर्माशी संबंधित परंपरा सर्वांसाठी अनिवार्य केल्या गेल्या, तर इतर समाजातील विद्यार्थी त्यांच्या परंपरांशी संबंधित कार्यक्रम सुरू करण्याची मागणी करू शकतात.'


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121