विद्येच्या मंदिरात राडा घालणाऱ्या संघटनेवर बंदी घाला!

"एनएसयूआय" विरोधात अभाविप आक्रमक

    15-Jul-2024
Total Views |

ABVP Protest in mumbai

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ABVP Protest in Mumbai) विद्यार्थी काँग्रेसच्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांनी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या कार्यालयात दारू पिऊन तोडफोड केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. अशाप्रकारे दारू पिऊन विद्येच्या मंदिरात राडा घालणाऱ्या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे. सोमवार, दि. १५ जुलै रोजी अभाविप कोंकण प्रदेशच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथील काँग्रेस कार्यालयासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
'विद्यार्थी काँग्रेसचे एनएसयूआय हे केवळ स्टूडंट युनियन नसून नॅशनल शराबी युनियन ऑफ इंडिया आहे. ते प्रभू श्रीराम विरोधी सुद्धा आहे.' अशी घणाघाती टीका अभाविपकडून आंदोलनादरम्यान करण्यात आली. मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थी काँग्रेसचा जाहीर निषेध केला आहे.