Delhi University : विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दारूपार्टी; रामाच्या मूर्तीची विटंबना
15-Jul-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) कॅम्पसमध्ये असलेल्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (डीयूएसयू) कार्यालयाची तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. रविवार, दि. १४ जुलै पहाटे घडलेल्या या प्रकरणात ४० जणांचा सहभाग असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचीही तोडफोड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेचे साक्षीदार असलेल्या गार्डने सांगितले की, तोडफोड करण्यापूर्वी एनएसयूआयचे विद्यार्थी डीयूएसयू कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या डीयूएसयू उपाध्यक्षांच्या खोलीत बसून मद्यप्राशन करत होते. या संपूर्ण घटनेत सहभागी असलेल्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अभाविपने विद्यापीठ प्रशासन आणि दिल्ली पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर अभाव दहिया यांना विद्यापीठाने डीयूएसयूच्या उपाध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी सुद्धा अभाविपने केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटले आहे की, एनयूएसआयच्या आश्रयाखाली दिल्ली विद्यापीठात बाहेरील असामाजिक तत्वांकडून गुंडगिरी आणि दारूबंदीचा उघड खेळ खेळला जातो. अभाविपने यापूर्वीही एनयूएसआयद्वारे केलेल्या गुन्हेगारांना आणि हिंसाचाराच्या संरक्षणास विरोध केला होता; तो भविष्यात देखील केला जाईल. मिळालेल्या माहिनीनुसार सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाने एक समिती स्थापन केली आहे.