उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये दीदी, गुरुजी विद्यार्थ्यांना शिकविणार!
13-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार, महिला शिक्षकांना 'मॅडम' ऐवजी 'दीदी किंवा बहनजी' तर पुरुष शिक्षकांना 'गुरुजी' असे संबोधावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन होणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती अंगीकारावी म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, विद्यार्थी शाळांमध्ये ‘नमस्ते’ किंवा ‘जय हिंद’ म्हणत शिक्षकांना अभिवादन करतील. या आदेशाच्या माध्यमातून शालेय स्तरावर भारतीय संस्कृती अंगीकारावी म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. संभल जिल्हा डीएमच्या सूचनेनुसार मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. पाऊल मुलांमध्ये शिक्षकांबद्दल आदर वाढविण्यास उपयुक्त ठरेल.
बीएसए अलका शर्मा यांनी सांगितले की, हा आदेश सर्व सरकारी शाळांसाठी जारी करण्यात आला आहे जेणेकरून सरकारी शाळांमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसावी. या आदेशान्वये सरकारी शाळांतील महिला शिक्षकांना आता दीदी किंवा बहिण जी असे संबोधले जाईल, तर पुरुष शिक्षकांसाठी गुरुजी हा शब्द वापरला जाईल. हे पाऊल मुलांमध्ये शिक्षकांबद्दल आदर वाढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.