वीरपत्नीचा अपमान करणाऱ्याविरोधात एफआयआर दाखल

    13-Jul-2024
Total Views |
fir martyer wife

 
नवी दिल्ली :        ‘कीर्तीचक्र’ सन्मानित हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या वीरपत्नी स्मृती सिंह यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


हे वाचलंत का? -     उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये दीदी, गुरुजी विद्यार्थ्यांना शिकविणार!


दरम्यान, एफआयआर भारतीय न्यायिक संहिता (बीएनएस) कलम ७९ आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. ही बाब ११ जुलै रोजी पहिल्यांदा उघडकीस आली. हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या वीरपत्नी स्मृती सिंह यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर एका व्यक्तीने अपमानजनक टिप्पणी केली. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती.