कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी होणार! नितेश राणेंचा विश्वास
26-Jun-2024
Total Views | 39
सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होणार असून महायूतीचे निरंजन डावखरे विजयी होतील, असा विश्वास भाजप आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला. बुधवारी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली. यावेळी नितेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "ज्याप्रकारे कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे पदवीधरांच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी लढले, त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. विरोधी उमेदावाराचा प्रचार आम्हाला कुठेही दिसला नाही. महाविकास आघाडीचे कोणतेही नेते रत्नागिरी-सिंधुदुर्गपर्यंत येताना दिसले नाहीत. नाना पटोले हे ठाण्यात सभा घेताना दिसले. निवडणूकीच्या काळात जे स्वत:च्या उमेदवारासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत येऊ शकत नाहीत ते पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी कोकणातील मतदारांचा विकास करु शकतात का? हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महायूतीसाठी विजयी घोडदौड सुरु ठेवणारी ही निवडणूक आहे. पदवीधर निवडणूकीत महायूतीचं वातावरण आहे. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर महायूती आणि एनडीएशिवाय दुसरा पर्यायच नसला पाहिजे," असेही ते म्हणाले.