टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू राजकारणात उतरणार!

    24-Jun-2024
Total Views | 179
team india cricketer poliitcs


मुंबई :       टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा मराठी खेळाडू केदार जाधव याने राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी मला राजकारणात यायला नक्कीच आवडेल", असे क्रिकेटपटू केदार जाधवने म्हटले आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने केदारचे वक्तव्य चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.


 
 
दरम्यान, मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे, पण आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रियादेखील केदारने दिली आहे. राजकारणाच्या माध्यमातून मायभूमीसाठी काम करण्यास आवडेल. मी देशासाठी खेळल्यामुळे माझे सर्वच राजकीय पक्षांसोबत आणि नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत, असेही केदार जाधवने सांगितले.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रिकेटपटू केदार जाधवने राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. टीम इंडिया माजी कप्तान एमएस धोनी बरोबरही या क्रिकेटरचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदारची कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121