सुनील दास निघाला बांगलादेशी घुसखोर मिनार हेमायत; बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत होता भारतात

    23-Jun-2024
Total Views |
 Bangladeshi national
 
गांधीनगर : बनावट भारतीय ओळख घेऊन भारतात आरामदायी जीवन जगणाऱ्या एका बांगलादेशी घुसखोराला गुजरात राज्यातून पकडण्यात आले आहे. मिनार हेमायत असे आरोपीचे नाव आहे. मिनार हेमायतला सुरत एसओजीने अटक केली आहे. तो शुभो सुनील दास नावाच्या बनावट हिंदू ओळखीसह राहत होता आणि त्याच नावाची सर्व बनावट कागदपत्रेही त्याच्याकडे सापडली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे तो कतारची राजधानी दोहा येथे दोन वर्षांपासून काम करत होता.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिनार हेमायत हा बांगलादेशी मुस्लिम आहे. त्याला सुरतच्या उना परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी शुवो सुनील दासच्या नावाने अनेक बनावट हिंदू ओळखपत्रे जप्त केली आहेत. आरोपींकडून जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रवेश आणि सोडल्याचा दाखला, बांगलादेशी राष्ट्रीय ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांसह अनेक बांगलादेशी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
  
 
भारतीय दस्तऐवजांमध्ये पश्चिम बंगालमधील शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, कतारसाठी निवासी परमिट कार्ड, भारतीय पासपोर्ट आणि घरभाडे कराराचाही समावेश आहे. वृत्तानुसार, हेमायत बांगलादेशातून २०२० मध्ये पश्चिम बंगालमधील सातखीरा सीमेवरून भारतात आला होता. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी शासित पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात त्याने हिंदू ओळखीचे बनावट कागदपत्रे बनवली.
  
बनावट कागदपत्रांचा वापर करून, त्याने भारतीय पासपोर्ट मिळवला आणि २०२१ ते २०२३ पर्यंत दोहा, कतार येथे काम केले. यानंतर तो सुरतला एका बांधकाम कंपनीत कामासाठी गेला. नुकतेच महाराष्ट्र एटीएसने भारतात अनेक बांगलादेशींना अटक केली आहे, ज्यामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान केल्याचे उघड झाले आहे.
  
या बांगलादेशी घुसखोरांनी गुजरातमधून बनावट पासपोर्ट बनवून त्याचा वापर करून परदेशात नोकरी मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. काही लोक बनावट भारतीय कागदपत्रांचा वापर करून सौदी अरेबियात गेले होते. या अटकांमुळे भारताच्या विविध भागात बनावट ओळखीखाली राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची गंभीर चिंता अधोरेखित झाली आहे. सरकारने या प्रकरणी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे, कारण ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे धोक्याचे ठरू शकते.