"तामिळनाडूत घडलेल्या हत्याकांडावर गांधी कुटुंबीय आणि खर्गे गप्प का?" - भाजपचा काँग्रेसला सवाल
23-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली : तामिळनाडूतील कल्लाकुराची जिल्ह्यात विषारी दारू पिल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ५६ वर पोहोचली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांवर विशेषत: काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजप प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा म्हणाले की, तामिळनाडूतील घटनेवर इंडी आघाडीच्या सर्व नेत्यांचे मौन आश्चर्यकारक आहे.
संबित पात्रा म्हणाले की, तामिळनाडूतील अवैध दारूचा प्रश्न दुःखद आणि गंभीर आहे. तामिळनाडूतील कल्लाकुराची जिल्ह्यात अवैध दारूमुळे आतापर्यंत ५६ जणांना जीव गमवावा लागला आहे. पुढे बोलताना संबित पात्रा म्हणाले की, "५६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे २०० लोक रुग्णालयात दाखल आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे, पण मला आश्चर्य वाटते की मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी वाड्रा, राहुल गांधी, सोनिया गांधी, द्रमुक आणि इंडी आघाडीचे लोक यावर मौन बाळगून आहेत."
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा विषारी दारु पिल्यामुळे झालेला मृत्यू नाहीये. तर हे सुनियोजितपणे घडवण्यात आलेले हत्याकांड आहे, असा आरोप केला.