रोजगार निर्मितीत महाराष्ट्र नंबर १ !

ईपीएफओ मध्ये रेकोर्ड ब्रेक सदस्यांची नोंदणी सर्वाधिक सदस्य महाराष्ट्रातून

    21-Jun-2024
Total Views |

epfo
 
मुंबई: ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation EPFO) संस्थेच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील सदस्यांची सर्वाधिक वाढ ईपीएफओ झाल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रोजगार निर्मितीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यातील नोंदणीत १८.९२ लाख सदस्यांची वाढ झाली आहे. पेरोत माहितीत आतापर्यंत पोहोचलेली ही सर्वाधिक संख्या आहे. मार्च २०२४ मध्ये ३१.२९ टक्क्यांनी नोंदणीत वाढ झाली असल्याचे नोंदणीतील माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.
 
महत्वाचे म्हणजे वाढलेल्या रोजगार निर्मितीमुळे तसेच कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीबाबत जनजागृती झाल्याने व याबद्दल माहितीची जाणीव झाल्याने ही आकडेवारी वाढल्याचे स्पष्ट केले गेले आहे. एप्रिल २०२४ मध्ये ८.८७ लाख सदस्यांची नवी नोंदणी झाली आहे. यातील बहुतांश सदस्यांचे वयोमान १८ ते २५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सदस्यांचा वाटा एकूण सदस्यांपैकी ५५.५ टक्क्यांपर्यंत गेला.
 
ईपीएफओ माहितीनुसार, यापूर्वी १४.५३ लाख सदस्यांनी ईपीएफओ सोडून दुसऱ्यांदा पुन्हा नोंदणी केली आहे. एकूण ८.८७ लाख नोंदणीकृत सदस्यांपैकी २.४९ लाख सदस्य महिला आहेत. मागच्या वर्षी संख्येपेक्षा महिला सदस्य नोंदणीत अधिकृत आकडेवारीनुसार ३५.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता ही संख्या एकूण ३.९१ लाख झाली. आता नोकरीच्या संधीत स्त्री, पुरूष समावेशकता आल्यानं प्रामुख्याने ही वाढ झाली. नोकरीच्या वाढीव संख्येत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागत या राज्यातील २०.४२ सदस्यांची संख्या वाढली आहे.
 
पेरोल आकडेवारी ही तात्पुरती आकडेवारी आली तरी ईपीएफओकडुन सातत्यपूर्ण आकडेवारी मोजणी होत असते. या आकडेवारीत निर्यात क्षेत्रातील सदस्यांत सर्वाधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.