धक्कादायक! वसईत प्रेमप्रकरणातून भर रस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या

    18-Jun-2024
Total Views |
 
Vasai
 
मुंबई : वसईमध्ये एका प्रियकराने भर रस्त्यात आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मुलीचा जीव जाईपर्यंत आरोपीने तिला लोखंडी पाना मारून तिची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली असताना कुणीही तिचा जीव वाचवण्यासाठी धावून गेलं नाही.
 
मंगळवारी सकाळी वसईच्या चिंचपाडा परिसरात एका तरुणाने एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी पान्याने सपासप वार करत भररस्त्यात दिवसाढवळ्या तिची हत्या केली. त्याने जवळपास १२ ते १४ वेळा तिच्यावर लोखंडी पान्याने वार केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओतील दृष्य अंगावर काटा आणणारं आहे.
 
हे वाचलंत का? -  चक्क कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय! व्हिडीओ व्हायरल
 
आरती यादव असे २० वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव असे आरोपीचे नाव आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये आजूबाजूला अनेक लोक जमलेले दिसत आहेत. परंतू, कुणीही त्या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे गेलेलं नाही. एक व्यक्ती पुढे गेला असता त्याच्यावरही आरोपीने लोखंडी पाना उगारला. त्यामुळे तो बाजूला झाल्याचं दिसतंय. दरम्यान, तरुणीचा जीव जाईपर्यंत आरोपी तिच्यावर वार करत राहिला. मात्र, कुणीही तिला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला नाही.