चक्क कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय! व्हिडीओ व्हायरल
18-Jun-2024
Total Views |
अकोला : नाना पटोले सोमवारी अकोला दौऱ्यावर होते. दरम्यान, यावेळी एका कार्यकर्त्याने चक्क त्यांचे चिखलाने माखलेले पाय धुतले. या घटनेचा व्हिडीओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. शिवाय यामुळे नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाना पटोलेंनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी ज्याठिकाणी पालखी थांबली होती त्या चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानाच्या प्रांगणात पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे नाना पटोलेंनी चिखलातूनच मार्ग काढत पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर तिथून ते आपल्या गाडीजवळ परत आले. यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय धुतले. या कृतीमुळे नाना पटोलेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे.