मुंबई : उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार नाव जाहीर केले असून आता त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, अनंत परांजपे, बाबा सिद्दीकी अशी अनेक नावं चर्चेत होती. दरम्यान, गुरुवारी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
काल आमच्या पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली असून चर्चेनंतर सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.