जरांगे आणि शिष्टमंडळ बैठकीत काय घडलं?

    13-Jun-2024
Total Views |
 
Jarange
 
जालना : मनोज जरागेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या भेटीसाठी गेलं होतं. मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला गेले होते. या भेटीदरम्यान, जरांगेंनी आपलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मनोज जरांगेंनी काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं होतं. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं होतं. यावेळी सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी राज्य सरकारला ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. परंतू, शंभुराज देसाई यांनी जरांगेंना एक महिन्याचा वेळ मागितला होता. त्यानंतर आता जरांगेंनी ही मागणी मान्य केली आहे.
 
हे वाचलंत का? -  जरांगेंनी आत्मक्लेश थांबवावा : छगन भुजबळ
 
"कुठलंही नवीन नोटिफिकेशन काढताना त्यावर हरकती घ्याव्या लागतात. तसं न करता घाईगडबडीत केलं तर ते कोर्टात रद्द होईल. त्यामुळे आपण हरकती मिळवण्याचंही काम सुरु केलं आहे. मी स्वत: याबाबत बैठक घेतो. तुम्ही तुमचे प्रतिनिधी बोलवा, असे आश्वासन यावेळी देसाईंनी जरांगेंना दिले. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी पाणी पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं.