ट्रूडो-मोदींचा आमना सामना? जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान इटलीच्या दौऱ्यावर

    13-Jun-2024
Total Views | 44
 MODI
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, दि. १३ जून २०२४ रोजी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणार आहेत. पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यावर मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. याआधी जी-७ शिखर परिषदेत भारत ११ वेळा सहभागी झाला आहे. तर पंतप्रधान मोदी पाचव्यांदा या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यात शुक्रवार, दि. १४ जून २०२४ द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
 
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होण्याची पुष्टी झाली आहे. मोदी इतर कोणत्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय बैठक करणार याची यादी अद्याप निश्चित केली जात असल्याचेही सांगितले होते. यासोबतच त्यांनी ट्रुडो यांची भेट होण्याची शक्यता नाकारली नाही.
 
 
मोदींच्या इटलीच्या दौऱ्याबद्दल अधिक माहिती देताना क्वात्रा म्हणाले, 'मुख्य मुद्दा हा आहे की कॅनडा अतिरेकी आणि हिंसाचाराचा पुरस्कार करणाऱ्या भारतविरोधी घटकांना राजकीय आश्रय देतो. ते पुढे म्हणाले, 'आम्ही वारंवार आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा करतो.'
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पाठवलेल्या अभिनंदन संदेशाबद्दल आभार व्यक्त केले होते. परस्पर समंजसपणा आणि एकमेकांच्या चिंतेचा आदर करण्याच्या आधारावर कॅनडाला सहकार्य करण्यास भारत तयार असल्याची ग्वाही मोदींनी दिली होती. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांमधील मुख्य मुद्दा कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांचा असल्याचे भारताने सातत्याने अधोरेखित केले आहे. याशिवाय खलिस्तान समर्थक गटांकडून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावल्याची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात सध्या तणावाचे वातावरण आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121