"तुम्ही इथून निघून जा, नाहीतर..."; राज्याच्या राजधानीतच कट्टरपंथीयांची हिंदू रहिवाशांना धमकी
13-Jun-2024
Total Views |
जयपूर : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये स्थलांतराच्या पोस्टर्समुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मात्र, यावेळी 'सर्व हिंदू समाज'च्या नावाने पोस्टर लावण्यात आले असून हिंदूंना घर न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ भिंतींवर असे पोस्टर्स दिसले कारण अनेक अहवालांनुसार, जयपूरच्या शास्त्री नगर भागातील हिंदू या परिसरात राहणाऱ्या कट्टरपंथीयांच्या त्रासाला कंटाळून आपली घरे सोडण्याचा विचार करत आहेत.
प्रशासनही आपले ऐकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या परिसरात चोरीच्या घटना, मुलींसोबत विनयभंग करणे हे प्रकार सर्रास होत आहेत, त्यामुळे त्यांना येथे राहणे कठीण झाले आहे. हे प्रकरण जयपूरच्या शास्त्रीनगर भागातील आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ येथील अनेक घरांवर पोस्टर दिसले. पोस्टरमध्ये सर्व हिंदू समाज असे लिहिले आहे. पोस्टर्समध्ये सर्व हिंदूंना आवाहन करण्यात आले आहे.
पोस्टरमध्ये ‘स्थलांतर थांबवा’ असे लिहिले आहे. ज्या व्यक्तीने ते जारी केले त्या व्यक्तीने पुढे लिहिले की, “सर्व सनातन बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी त्यांची घरे गैर-हिंदूंना विकू नका.” हे पोस्टर शास्त्री नगरच्या अनेक घरांवर चिकटवलेले दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्री नगरच्या अनेक भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. येथील अनेक रहिवाशांनी परिसरातील कट्टरपंथीयांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आम्ही स्थलांतर करण्याचा निर्णय घेत आहोत.
शास्त्री नगर परिसरात आपल्या बहिणी आणि मुली सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कट्टरपंथी लोक त्यांच्या जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करत असल्याचा दावाही स्थानिक रहिवाशांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्यांच्या समस्या ऐकून घेण्यास तयार नसल्याचेही या सर्वांनी सांगितले. स्थानिक हिंदू रहिवाशांनी सांगितले की, रात्री त्यांच्या घराचे दरवाजे वाजवले जातात. घरे विकून दुसरीकडे जाण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. कधी कधी घरांवर दगडफेक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने मीडियाला सांगितले की, “ते इथे येतात आणि एवढा गोंधळ करतात की मी तुम्हाला काय सांगू. मुली बाहेर उभ्या राहू शकत नाहीत. येथे शिट्ट्या वाजवल्या जातात. रोज रात्री चोरीच्या घटना घडत आहेत. सरकारी शाळेत मुलींना सुटी असते तेव्हा तिथे अनेक वाहने उभी असतात. दरम्यान, मागून बोलणाऱ्या एका व्यक्तीने कट्टरपंथी तरुणांवर रात्री २-२ वाजेपर्यंत दारूच्या नशेत फिरत असल्याचा आरोप केला.