मुंबई: कॅपिटल मार्केटने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सीएनबीसी आवाजचे माजी निवेदक प्रदीप पांड्या व इतर सात लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सगळ्यांना मिळून २.६ कोटींचा दंड सेबीने सुनावला आहे. अल्पेश फुरिया, मनिष फुरिया, अल्पा फुरिया, अल्पेश फुरिया, मनिष फुरिया, महान इन्व्हेसमेंट, तोशी ट्रेड या सगळ्यांना सेबीने शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी प्रतिबंध केले आहे.
ही कारवाई अंतर्गत माहितीचा दुरोपयोग केल्याने सेबीने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. प्रदीप पांड्या व इतर सात व्यक्तीं ना पाच वर्षांसाठी बाजारात ट्रेडिंगसाठी प्रतिबंध केला आहे. प्रदीप पांड्या यांनी सीएनबीसी टीव्हीवर ऑगस्ट २०२१ मध्ये निवेदक म्हणू न काम केले होते. तसेच अल्पेश फुरिया यांनी तज्ञ म्हणून टीव्ही चॅनेलवर पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. या सगळ्या आरो पींना शेअर बाजारात खरेदी, विक्री, डिलिंगसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.तसेच पांड्या व फुरिया यांना प्रत्येकी एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे तर इतर आरोपींना १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
'बेकायदेशीर नफा' या गुन्ह्याखाली पांड्या व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंदवला गेला आहे. शेअर बाजारातील कंपन्यांच्या ' खाजगी' माहितीचा वापर व्यक्तिगत ट्रेडिंगसाठी करून स्वतःचा फायदा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. डिसेंबर २०२० मध्ये एनएसईने पांड्या व फुरिया यांच्याविरोधात अहवाल सादर केला गेला होता. नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ मध्ये सेबीने या प्रकरणात चौकशी केली असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे. पांड्या यांनी ' पांड्या का फंडा' या कार्यक्रमात व बाय टुडे सेल टुमारो व इंट्राडे कार्यक्रमादरम्यान कथित नियमांचे उल्लंघन पांडयांनी केला असल्याचे सेबीने आपल्या ५५ पानी आरोपपत्रात म्हटले आहे.
अल्पेश फुरिया यांनी खाजगी माहितीचा वापर विशेषाधिकारित फायदा घेत त्यांच्या माहितीचा फायदा घेत त्यांच्या स्वतः च्या खात्याद्वारे आणि संबंधित संस्थांद्वारे व्यवहार केले तसेच शिफारसी सार्वजनिक करण्यापूर्वी स्वतःच्या नफ्यासाठी शिफारशींचा फायदा करून घेतला असल्याचे यात म्हटले आहे.
पंड्यानी ही गोपनीय माहिती अल्पेश फुरिया आणि संबंधित संस्थांना दिली, ज्यांनी त्याच्या शोमध्ये पांड्याने केलेल्या शिफारशींशी समक्रमण करून, वारंवार आणि सातत्यपूर्ण व्यापार केला. या प्रकरणी पंड्या यांचा मोबाईल डिटेल्स देखील तपासण्यात आली होती.