"एकदा का नाटक फ्लॉप झालं तर..."; फडणवीसांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

    06-May-2024
Total Views | 73

Fadanvis & Kolhe 
 
पुणे : लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा पाहायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही जात नाहीत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हेंवर केला आहे. सोमवारी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आढळराव पाटील यांनी पक्ष बदलला नाही. जागावाटपात शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पण मी त्यावेळी म्हटलं की, जागा जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली तरी उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांनाच देऊ. त्यामुळे त्यांनी पक्ष बदललेला नाही. आम्ही तिघेही एका विचाराने सोबत आलो आहोत."
 
हे वाचलंत का? -  "धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबद्दल दाखवलेलं सगळं खोटं!"
 
"मागच्या वेळी पालघरमध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला जागा आणि उमेदवार दोन्ही द्या असं म्हटलं. आमच्या खासदाराला आम्ही उद्धव ठाकरेंना दिलं आणि पुन्हा तिथून निवडून आणलं. त्यामुळे एका विचारात काम करत असताना पक्ष बदलला असं काहीच नसतं. समोरच्या उमेदवाराने किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या ५ वर्षात कितीवेळा फेसबूक पोस्ट टाकल्या हे त्यांना विचारावं. ते कुठे कुठे जाणार होते आणि कसे थांबले याबद्दलचं सत्य आम्ही सांगितलं तर त्यांचा चेहरा उघड होईल. पण आढळरावांपेक्षा ते एका गोष्टीत सरस आहेत. आढळराव नाटककार नाहीत. ते खूप नाटकी आहेत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं आणि चुगलेबाजीही करता येते. पण एक लक्षात ठेवा की, लोकं नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणीही नाटक पाहायला जात नाहीत," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121