बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम, त्यामुळे मी कधीही...: पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

    03-May-2024
Total Views |
 
Modi & Balasaheb Thackeray
 
मुंबई : बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं त्यामुळे मी कधीच त्यांचं कर्ज विसरु शकत नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. गुरुवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं भाष्य केलं.
 
नरेंद्र मोदी म्हणाले की, "बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं. त्यामुळे मी त्यांचं कर्ज विसरु शकत नाही. आज आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ही बाळासाहेबांनी मी दिलेली श्रद्धांजली आहे. उद्धव ठाकरे मला कितीही शिव्या देतील तरी मी त्यांना उत्तर देणार नाही. कारण बाळासाहेबांप्रती मला श्रद्धा आहे."
 
हे वाचलंत का? -  सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर कोसळलं!
 
"उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना सगळी कामं बाळासाहेबांच्या मुलभूत विचारांच्या विरोधात केली. औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचा मुलगा बसला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ते बसलेत. त्यामुळे लोकांच्या भावना आमच्यासोबत आहेत तर त्यांच्याकडे राग आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "यावेळी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की, परिवाराच्या सुखासाठी उद्धवजींनी बाळासाहेबांचं स्वप्न का तोडलं? म्हणूनच महाराष्ट्रातील मतदाता भावनिकदृष्ट्या आमच्याशी जोडलेला आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121