कधी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा? काय आहे तारीख? जाणून घ्या

    27-May-2024
Total Views |
loksabha election result pm



मुंबई :   
  लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात सत्ता स्थापन करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? -  दिल्ली विद्यापीठात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे नारे; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात!


दरम्यान, येत्या १० जूनला नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ०४ जून रोजी लागणार असून एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तसेच, नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर भाषणात भाजपला देशभरात ४०० हून अधिक जागा मिळणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे येत्या ०४ जूनला केंद्रात भाजप बहुमताने सत्तेत येत नरेंद्र मोदी दि. १० जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदी दि. १० जूनला दिल्लीत पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन पुढे ढकलणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भाजप पक्षांतर्गत नेत्यांना आपण ३०० जागांचा टप्पा पार केला असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करु असा विश्वास वाटतो आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर येत्या १० जूनला नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे.