
मुंबई: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरोजगारीत मोठी घसरण झाली आहे. कोविड काळानंतर प्रामुख्याने ही घट झाली असुन संघटित रोजगार निर्मितीत मोठी वाढ झाली आहे. ईपीएफओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ईपीएफओचा पे रोलमध्ये झालेल्या वाढीत भर होताना काही सदस्य पुन्हा ईपीएफओ (EPFO) सोबत जोडले गेले असल्याचे म्हटले आहे.
वाढणारी अर्थव्यवस्था मजबूत असतानाच रोजगार निर्मितीत ही वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेला मनुष्यबळ संसाधन पुरक ठरत आहे. किंबहुना असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या ई शरम पोर्टल, एमएसएमई पोर्टल मध्ये वाढणारी आकडेवारी यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे. मे २२, २०२४ पर्यंत एमएसएमई (MSME) ४.४ टक्क्यांनी झालेले नोंदणीकरण हे त्याचेच उदाहरण आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पेरोलमध्ये १.४७ कोटी सदस्यांची वाढ झाली आहे. ही वाढ मागच्या वर्षी १.३९ कोटीवर झाली होती. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ ६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १.८ कोटी सबस्क्राईबरची वाढ झाली आहे. यांमध्ये नवीन सदस्यवाढीत ५६.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्या सदस्यांची वय १८ ते २५ वर्षाच्या दरम्यान आहेत. पुन्हा ईपीएफओ मध्ये काही सदस्य पुन्हा जोडले गेल्याने समाजरचनेत प्रगती होत असल्याचे लक्षण दिसून आले आहे. ज्या तुलनेत सदस्य सोडत जात आहेत त्याहून अधिक नवीन सदस्य जोडले जात असल्याचे ईपीएफओ अहवालात म्हटले गेले होते.
ईपीएफओने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोडलेल्या सदस्यांपैकी, ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये काहींनी नोकरी पत्करली त्यामुळे ही रक्कम त्या खात्यात जमा झाली होती. आर्थिक वर्ष २०२३ पेक्षा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ईपीएफओमधून निर्वाणीचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ईपीएफओ सोडलेल्यांची संख्या १.३४ कोटी होती जी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये घट होत १.२५ कोटी झाली आहे.
तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या व्यापक स्तरावर वाढती रोजगार निर्मिती स्पष्टपणे दिसून येते. पीएमआय मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) रोजगार उप-निर्देशांक उत्पादन क्षेत्रामध्ये अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास सूचित करतो, ज्याला चालू परिस्थितीत सुधारणा, चांगली मागणी, नवीन व्यवसाय सेवन आणि वाढीव उत्पादनामध्ये वाढ या गोष्टींचा पाठिंबा आहे.
त्याचप्रमाणे, पीएमआय सेवा उप-निर्देशांकाने देशांतर्गत वाढीव मागणी, नवीन व्यवसाय नफा आणि आंतरराष्ट्रीय विक्रीतील वाढ यांच्या संयोगातून सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीमध्ये एक देशाने एक नवीन पाऊल टाकले आहे.