पुणे अपघात प्रकरण : पोलीस आयुक्त म्हणाले, दोन एफआयआर...!

    24-May-2024
Total Views | 20
porsche accident case
 

मुंबई :      पुणे अपघात प्रकरणात नवी अपडेट्स समोर येत आहे. विशाल अग्रवाल यास अटक झाल्यानंतर तपासाला दिशा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, येरवडा पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पीआय व पीआय अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे अपघात प्रकरणात पुणे पोलीस तपास करत असून नवीन माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघातानंतर अनेक स्तरावर टीकेची झोड उठवली होती. या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पबमधील कर्मचारी यांना अटक केली. तसेच, अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
 
 
वेदांत अग्रवालची बाल सुधारगृहात रवानगी! 'असा' असेल दिनक्रम


दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, अजित पवार गटाचे आ. सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, हे सत्य आहे, असे पोलीस आयुक्तांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर, पोलीस आयुक्तांनी सांगितले की, सदर अपघातप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच, या प्रकरणात पहिला एफआयआर सकाळी ८ वाजता दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, सदर प्रकरणात भादंवि कलम ३०४(अ) लावले होते. परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहून सकाळी ११ ते १२ दरम्यान दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला. त्यात भादंवि कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परिणामी, दोन्ही एफआयआर एकाच दिवशी दाखल झाल्याने त्यास दोन एफआयआर म्हणता येत नाही, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. दुसरा एफआयआर अल्पवयीन मुलाचे वडील आणि पब चालकावर दाखल करण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
अभिराम भडकमकर यांच्या सीता कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव!

अभिराम भडकमकर यांच्या सीता कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव!

प्रख्यात लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या सीता या कादंबरीने प्रकाशनानंतर अल्पावधीतच यशाची अनेक शिखरं गाठली. अशातच आता पुन्हा एकदा या कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे. इचलकारंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकारंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने 'सीता' या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात नागपूरच्या 'अभिव्यक्ती' वैदर्भीय लेखिका संस्थेच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार 'सीता' या साहित्यकृतीला प्रदान करण्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121