डोंबिवलीतील उद्योग इतरत्र हलविण्यासाठी ठाकरेंनी काय केलं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
24-May-2024
Total Views | 26
मुंबई : डोंबिवली एमआयडीसीत बॉलयर स्फोटातील मृतांची संख्या आत्तापर्यंत मृतांचा आकडा ११वर पोहोचला आहे. यावरुन विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांचे चांगलेच कान उपटले आहेत. डोंबिवलीतील उद्योग इतरस्त्र हलवले जावेत यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यासाठी काहीही केलेले नाही. त्यांनी केलेला एक निर्णय किंवा फाईल मला दाखवा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगांना पर्यायी जागा दिल्या पाहिजेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुण्यतील पोर्शे कार दुर्घटना प्रकरणीही फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले. "महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचे राजकीयकरण हा विरोधकांचा उद्योग सुरू झाला आहे. बालहक्क न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात वरील कोर्टात जाऊन आम्ही पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
दुष्काळाबाबत फडणवीसांचं पवारांना उत्तर
शरद पवार आणि अन्य विरोधी पक्ष हे नकारात्मक मानसिकतेत गेले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबद्दल बैठक घेतली आहे. दुष्काळासारख्या गंभीर गोष्टींवर शरद पवारांनी राजकारण करणे हे त्यांना शोभत नाहीत. त्यांच्या काही सूचना असतील तर जरूर त्यांनी द्याव्यात त्या सूचनांचा आम्ही विचार करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रशासनाने दुष्काळात निवडणूका असूनही टँकर पुरवठा आणि अन्य उपाययोजना नीट पार पडल्या आहेत. पूर्ण गंभीरतेने सरकार याकडे विचार करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.