बलात्कारामुळे पीडितेची बिघडली होती मानसिक स्थिती; २ वर्षांनंतर पटली आरोपींची ओळख! मोहम्मद, शबील, फैजल पोलिसांच्या ताब्यात

    22-May-2024
Total Views |
 Kerala Rape
 
कोची : केरळमधील कोझिकोड येथे एका महिलेवर बलात्कार आणि तिच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी तीन आरोपींना घटनेच्या दोन वर्षांनंतर पकडण्यात आले. घटनेच्या दोन वर्षांनंतर पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आले कारण घटनेनंतर बलात्कार पीडितेची मानसिक स्थिती बिघडली होती.
 
मिळालेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शफी, मोहम्मद शबील आणि मोहम्मद फैसल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरात काम करणाऱ्या एका महिलेची भेट घेतली. यानंतर ते तिच्या घरी आले आणि तिच्यावर सतत बलात्कार आणि अत्याचार करू लागले. त्यांनी तिच्या मुलावर गरम पाणी टाकण्याचा प्रयत्न केला आणि महिलेवर अत्याचार केला.
 
 
या संदर्भात महिलेने जून २०२२ मध्ये पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तिने या तिघांची नावे केरळ पोलिसांना दिली आणि आपल्यासोबत काय झाले ते सांगितले. याप्रकरणी पोलीस कारवाई करण्यापूर्वीच महिलेचे मानसिक संतुलन बिघडले आणि ती नैराश्यात गेली.
 
महिलेची मानसिक स्थिती एवढी अस्थिर झाली की तिला तिला उपचारासाठी जावे लागले. तिच्या मुलालाही बाल संरक्षण गृहात पाठवण्यात आले. या कारणास्तव पोलिसांना महिलेकडून घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. महिलेकडून माहिती मिळवता न आल्याने प्रकरणाचा तपास ठप्प झाला.
 
 
पोलिसांना महिलेचा जवाब न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यामुळे ते आरोपीच्या ओळखीबाबत कोणतीही माहिती गोळा करू शकले नाहीत. मात्र, ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली. जून २०२३ मध्ये महिलेला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त घोषित करण्यात आले. यानंतर ती काम करू लागली आणि तिच्या मुलाची काळजीही घेऊ लागली.
 
महिला बरी झाल्यानंतर पोलिसांनी डिसेंबर २०२३ मध्ये तिच्याशी संपर्क साधला. यानंतर महिलेने तिन्ही आरोपींची नावे स्पष्टपणे सांगितली. यासोबतच त्यांनी एक डायरीही दिली ज्यामध्ये अनेक नंबर लिहिले होते. तपासादरम्यान पोलिसांना एक नंबर सापडला जो एका आरोपीचा होता.
 
पोलिसांनी या क्रमांकाचे लोकेशन शोधून एका आरोपीला पकडले. यानंतर त्याच्या चौकशीच्या आधारे उर्वरित दोन आरोपींनाही पकडण्यात आले. या घटनेनंतर या लोकांनी नंबर बदलल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांचे फोटो काढून पीडितेला दाखवले, त्यांनी लगेचच त्यांची ओळख पटवली. याप्रकरणी पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.