मुंबई: बाजारात इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठा उच्चांक प्रस्थापित केला गेला आहे.अखेरीस मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली असली तरी ट्रेडिंग दरम्यान बीएसईतील बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ४३२२२३.६९ व ४८०९९.२९ पातळीवर गेल्याने बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते.
यामध्ये इंट्राडे व्यवहारात गुंतवणूकदारांनी २ लाख कोटींची कमाई केली आहे. मार्केट कॅपिलयाझेशन बाबतीत भारत सर्वाधिक अधिक बाजारी भांडवल असणारा पाचवा देश ठरला आहे. युएस, चीन, जपान, हाँगकाँग नंतर भारताने पाचवा नंबर पटकावला आहे. बीएसईत यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये ४ ट्रिलियन डॉलरवर बाजार पोहोचले होते. सहा महिन्यांत बाजारात हा आकडा ४१४.४६ लाख कोटी अथवा ५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे.
ब्लूमबर्गच्या मते, २०२४ मध्ये आतापर्यंत भारताचे बाजार भांडवल जवळपास १२ टक्क्यांनी वाढले आहे, तर अमेरिकेसाठी ते 10 टक्क्यांनी वाढले आहे आणि हाँगकाँगचे भांडवल १६ टक्क्यांनी वाढले आहे. चीन आणि जपानचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर स्थिर राहिले आहे, चीन १.४ टक्के घसरला आहे आणि जपान फक्त ३ टक्क्यांनी वाढला आहे.
का वाढत आहे?
भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजारात मोठी वाढ होत आहे. मुख्यतः २०२४ मध्ये सेन्सेक्समध्ये २.३ टक्क्यांनी वाढ झाल्याने ही वाढ प्रकर्षाने जाणवत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएई (मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये अनुक्रमे १६.३ व ११.५ टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारात मोठी वाढ झाली. याशिवाय बाजारातील समभागात चढउतार (Volatility) मोठ्या प्रमाणात देखील वाढली आहे.