उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची जाहीर माफी!

    02-May-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
कोल्हापूर : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर माफी मागितली आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरेंनी स्पष्टीकरण देत संभाजीराजेंची माफी मागितली. ते कोल्हापूर येथील सभेत बोलत होते.
 
उबाठाने राज्यसभा निवडणुकीच्या वेळी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली नाही. मग आता त्यांचा एवढा पुळका का आला? असा सवाल उदय सामंत यांनी केला होता. तसेच राज्यसभा निवडणूकीत संभाजीराजेंचा अपमान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
 
हे वाचलंत का? -  डोंबिवलीत युवराजांच्या दौऱ्यानंतर थोड्याच वेळात उबाठाला मोठं खिंडार!
 
यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "मी संभाजीराजेंबद्दल काय निर्णय घेतला होता हे मला आणि संभाजीराजेंना माहिती आहे. याचा अर्थ आमची मैत्री आणि आमचे ऋणानुबंध तुटले असं नाही. पण मला एक कुणकुण लागली होती की, जसा तेव्हा तुम्ही माझा संजय पाडलात तसा दगाफटका केला असता तर ते पाप कोणाच्या माथी आलं असतं?"
 
"तरीही समजा मी संभाजीराजेंसोबत मी चुकीचं वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण संभाजीराजेंबाबत मी चूकलो असेन तर आज तुम्ही तीच चूक छत्रपती शाहू महाराजांबाबत का करत आहात? तुम्ही का त्यांना पाडायला उभे आहेत? आम्ही शेण खाल्लं असेल पण म्हणून तुम्ही का शेण खाता? शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे. कारण त्यांनी कधीच मी कोणीतरी आहे हे जाणवूच दिलं नाही," असे ते म्हणाले.