मुंबई: Awfis Space Solutions या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. २२ मे ते २७ मे २०२४ या काळात हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. कंपनीतर्फे सांगण्यात आल्याप्रमाणे या कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) २८ मे पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १.२३ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
कंपनीने या आयपीओसाठी प्राईज बँड ३६४ ते ३८३ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांसाठी ३९ समभागांचा गठ्ठा (Lot) उपलब्ध असणार आहे.कमीत कमी या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना १४९३७ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ICICI Securities Limited, Axis Capital Limited, IIFL Securities Limited, Emkay Global Financial Services Ltd या कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. २८ पर्यंत आयपीओचे वाटप होणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २९ मेपासून मिळू शकतो. अंतिमतः कंपनी ३० मे २०२४ पासून शेअर बाजारात नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.
या आयपीओतील ७५ टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे तर १० टक्क्यांपर्यंत वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) उपलब्ध असणार आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) एकूण आयपीओमधील १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
ही कंपनी डिसेंबर २०१४ मध्ये स्थापन झाली होती.ही कंपनी मुख्यतः वर्कस्पेस सेवा व तत्सम सुविधा पुरवते. ज्यामध्ये फ्लेक्सिबल वर्क स्पेस, इतर ऑफिस स्पेस, मोबिलिटी सोलूशन सेवा अंतर्भूत आहेत.आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या महसूलात १०३ टक्क्यांनी वाढ होत ५६५.७९ कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनींच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) १८.४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) अमित रमानी हे आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर भांडवली खर्च (Capital Expenditure) करण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी , दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे.