४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा आणि शरद पवार गट फुटणार!
भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा
16-May-2024
Total Views |
मुंबई : ४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा गट आणि शरद पवार गट फुटणार आहे, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
मोहित कंबोज आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "४ जूननंतर पुन्हा उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटेल. या पक्षांमध्ये उरलेले आमदार, नेते आणि कार्यकर्ते त्यांचा पक्ष सोडतील. यातील बरेच लोक आता इतर पक्षांच्या संपर्कात आहेत," असा दावा त्यांनी केला आहे.
राज्यात चार टप्प्यातील लोकसभा निवडणूका पार पडल्या असून पाचव्या आणि टप्प्यातील निवडणूकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील ६ मतदारसंघांचा समावेश आहे. अशातच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणध्ये सभा पार पडली. त्यानंतर घाटकोपरमध्ये त्यांचा रोड शोही झाला. त्यानंतर गुरुवारी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे.
येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणूकांचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीमध्ये महायूती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मोहित कंबोज यांनी पून्हा एकदा उबाठा गट आणि शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.