शशी थरुर परत जा, तुम्हाला मत नाही, केरळमधील जनतेचा विरोध!
09-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : केरळमधील तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर यांना कार्यकर्त्यांनी रोखले आहे. बलरामपुर येथे निवडणूक प्रचारादरम्यान थरुर यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आले. यासंदर्भात एक व्हिडीओदेखील सोशल मीडियातून समोर आला आहे. ज्यात कार्यकर्ते त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. यावेळी खा. थरुर यांना कामगारांनी परत जा, तुम्हाला मत नाही, असे सांगितले.
Trivandrum rocks. Shashi Tharoor was shamed by people of BalaramPuram when he came for campaign. Public starting shouting “We won’t vote for you… “
दरम्यान, सदर लज्जास्पद घटना घडली तेव्हा शशी थरूर स्थानिक काँग्रेस आमदार एम व्हिन्सेंट यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाले होते. या घटनेने काँग्रेस नेतृत्व अस्वस्थ झाले असून त्याचवेळी विरोधी पक्ष खिल्ली उडवण्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. जनम टीव्हीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
'परत जा, तुम्हाला मते मिळणार नाहीत, असे म्हणत शशी थरुर यांच्याविरोधात जनतेकडून निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, थरूर हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा खूप आदर आहे. थरूर यांची प्रतिमा खराब करू इच्छिणाऱ्या लोकांकडून असे अनेक प्रयत्न केले जात आहेत. या घटनेमागे सीपीएम कार्यकर्त्यांचा हात आहे.