“खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी...” सिद्धांत बनकरने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल केला खुलासा

Total Views |

savarkar 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या सावरकरांचे संपुर्ण जीवन या चरित्रपटात रणदीपने मांडले आहे. या चित्रपटाबद्दल आपले मत नोंदवताना सिद्धांत बनकर याने ‘महाएमटीबी’शी बातचीत करताना, “खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryveer Savarkar) चित्रपट आवर्जून पाहावा”, असं तरुणाईला आवाहन केले आहे.
 
सिद्धांत बनकर म्हणाला, “स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर व्यक्तिमत्वावर चित्रपट करणं म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे. आणि दिग्दर्शक अभितेने रणदीप हुड्डा यांनी ती जबाबदारी उत्तमरित्या पेलली आहे. सावरकर हे व्यक्तिमत्व फार मोठं असून स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात ते उत्कृष्टपणे मांडण्यात आले आहे”.
  
पुढे बोलताना सिद्धांत बनकर असं म्हणाला की, “सावरकरांनी किती सोसलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटलेल्या सावरकरांबद्दल देशात वाईट बोललं जातं. आणि वाईट याचं वाटतं की त्यात बरीच मराठी तरुणाई आहे; जिला सावरकर नेमके काय होते हे ठाऊकच नाही आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सावरकरांबद्दल जे ऐकलं जातं त्यावर विश्वास ठेवणाऱ्या या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहायला हवा आणि सावरकर वाचायला हवेत. खरं हिंदुत्व काय असतं? एक नागरिक म्हणून आपण देशाचं काय देणं लागतो. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना नक्की कळेल”.
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.