सकाळच्या सत्रात घसरण झाली असता आज बाजारात मोठे चढ उतार पहायला मिळाले आहेत. मात्र अखेरच्या सत्रात बाजाराने कमबॅक केले. बाजारात अखेरीस सेन्सेक्स २०.५९ अंशाने वाढत (०.३ टक्क्याने) ७४२४८.२२ पातळीवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ५० अखेरच्या टप्प्यात ०.९५ टक्क्याने वाढत २२५१३.७० पातळीवर स्थिरावला आहे. आज बाजारात गुंतवणूकदारांनी अनेक क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र कौल दिले आहेत. परंतु रेपो दर स्थिरावल्यानंतर आज अखेरीस बँक निफ्टीत मोठी वाढ झाल्याने आज बाजार तेजीत बंद झाले.
आज बीएससीत सगळ्या निर्देशांक हिरवा कंदील अखेरीस दिसला आहे. बीएससी मिडकॅप व स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांकात ०.५० टक्क्याने वाढ झाली आहे. एनएससीमध्ये निफ्टी मिडकॅप ०.६२ टक्क्याने व स्मॉलकॅपमध्ये ०.८३ टक्क्याने वाढ झाली आहे. एनएससीमध्ये क्षेत्रीय निर्देशांकात हेल्थकेअर, आयटी, मिडिया वगळता उर्वरित निर्देशांकात वाढ झाली आहे.
आज अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक वाढ रियल्टी समभागात (१.८३ %) झाली आहे. बँकेने रेपो दर स्थिर ठेवल्याने घरांच्या कर्जातील व्याजात कुठलाही बदल होणार नसल्याने घरांच्या मागणीत वाढ होऊ शकते या बाजारातील भावनेमुळे आज रिअल्टी क्षेत्रात वाढ झाली आहे. याशिवाय पीएययु बँकेत (०.७४ %) देखील वाढ झाली आहे. तिमाहीतचे निकाल व रेपो दर पार्श्वभूमीवर बँक निर्देशांकात उसळले आहेत. सर्वाधिक घसरण आयटी निर्देशांकात झाली आहे. जागतिक क्षेत्रातील आयटी मधील मंदीच्या कारणास्तव ही घट असू शकते.
बीएससीत (BSE) ३९४८ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना २४२७ समभागावर आज गुंतवणूकदारांना फायदा झाला असून १४२२ समभागांचे मूल्यांकन आज घसरले आहे. ५२ आठवड्यातील २१५ कंपन्यांचे समभाग आज सर्वाधिक किंमतीवर पोहोचले तर ९ कंपन्यांचे समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी किमतीत राहिले आहेत.४५७ समभाग आज अप्पर सर्किटवर पोहोचले असून १३४ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
एनएससीमध्ये २७२३ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना १६०३ कंपनीचे समभागाचे आज मूल्यांकन वधारले आहे तर १०१२ कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन आज घसरले आहे. यामध्ये १७६ समभाग आज अप्पर सर्किटवर पोहोचले असून ३ कंपन्यांचे समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. ब्रेंट क्रुड निर्देशांकात ९० डॉलर पर्यंत प्रति बॅरेल किंमत सकाळपर्यंत पोहोचली होती. युरोप व मध्य पूर्व देशातील वाढत्या दबावामुळे पुरवठ्यात तूट निर्माण झाली आहे. युएस वेस्ट टेक्सास निर्देशांकात ८६ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत क्रूड तेलाची किंमत पोहोचली होती. त्यामुळे आशियाई बाजारातील तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. एमसीएक्समधील तेलाच्या किंमतीत १.३६ टक्क्याने वाढत ७२२० रुपये प्रति बॅरेल या विक्रमी दराने क्रूड निर्देशांक वाढला आहे.
रुपयांच्या तुलनेत डॉलरच्या मुल्यांकनात वाढ झाली आहे. त्यामुळे डॉलरचे भाव वधारले असल्याने सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा ४९० रुपयाने घसरण झाली आहे. एकूणच आज बँक निर्देशांकात सकारात्मकता दिसल्याने आज बाजार सावरून वरच्या अंकात बाजार स्थिरावले आहे.
बीएससीमध्ये कोटक महिंद्रा, आयटीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, एसबीआय, पॉवर ग्रीड, एचयुएल, एनटीपीसी या समभागात वाढ होत बीएससीत अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एशियन पेटंस, मारुती सुझुकी,टायटन कंपनी, जेएसडब्लू सिमेंट, सनफार्मा, टीसीएस, टाटा मोटर्स, इन्फोसिस,एक्सिस बँक, नेसले या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
एनएससीमध्ये कोटक महिंद्रा, एसबीआय लाईफ, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एचडीएफसी लाईफ, श्रीराम फायनान्स, एसबीआय, अदानी पोर्टस, डॉ रेड्डीज, एम अँड एम, इंडसइंड बँक,अदानी एंटरप्राईज,आयशर मोटर्स,डिवीज, एचसीएलटेक,पॉवर ग्रीड, एचयुएल, हिरो मोटोकॉर्प या समभागात फायदा झाला असून गुंतवणूकदारांना नुकसान अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, बजाज ऑटो, लार्सन, बीपीसीएल, हिंदाल्को, भारती एअरटेल, एशियन पेटंस, सिप्ला,अपोलो हॉस्पिटल, सनफार्मा,टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, नेसले, टाटा मोटर्स, कोल इंडिया या समभागात झाले आहे.
रेपोदराव्यतिरिक्त भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी पहायला मिळेल असे रिझर्व्ह बँकेने सांगितल्याने आज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असल्याचे पहायला मिळाले आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' आज रिझर्व्ह बँकेने रेपो दरात काहीही बदल केलेले नाहीत .जे बाजाराला अपेक्षितच होते. परंतु या महिना अखेरीस अमेरिकन फेड च्या बैठकीत ही दर कपात अपेक्षित नाही किंबहुना काही होणार नाही पण जुन २०२४ नंतर दर कपातीस पाव टक्क्याने अमेरिकेत , नंतर आपल्या कडे अर्धा टक्का कपात होण्यास सुरवात होईल. तोपर्यंत मार्केट हे कंसोलिडेशन प्रक्रियेतून मधुन जात राहील ,जे बाजारासाठी खुपच हेल्दी राहील. तोपर्यंत चांगले स्टाॅक शोधत रहा.मिडकॅप व स्माॅल कॅप मधे खुप चांगल्या संधी असतील.२० तारखेला HDFC चा विलीनीकरणानंतर येणारा पहीलाच वार्षिक निकाल खूप उत्साहवर्धक असणार आहे.AGM च्या केवळ बातमीवर तो 50 रुपयाने वर आलाय.
आज बाजार दर वाढ न झालयाने निर्धास्त झाला आहे.हाउसिंग ,बॅकिग मोठ्या औद्योगिक क्षेत्रात जैसे थे दरांमुळे येणारा पुढील काळ हा भारतासाठी गतिमान राहील यात शंका नाही.दरकपाती नंतर शेअर बाजाराची घोडदौड पाहु शकतो. तोपर्यंत स्थिर सरकार ही येईल.. अनेक पायाभुत क्षेत्र ,डिफेन्स, स्टील , सिमेंट , केमिकल डिमांड मधे राहील '
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, 'आरबीआयची धोरण बैठक अपेक्षेप्रमाणे उलगडली असली तरी, अन्नधान्याच्या चलनवाढीबद्दलची चिंता आणि उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यांमुळे भावनांना तडा गेला. मुख्य देशांतर्गत निर्देशांकांनी किरकोळ हालचाल केली, तर Q4FY24 मध्ये मजबूत पत वाढीमुळे बँक निफ्टी उंचावला. जागतिक भावना तेलाच्या किमती वाढल्याने आणि मध्य पूर्वेतील तणाव यामुळे कमी झाले. गुंतवणूकदार आगामी यूएस नॉन-फार्म पेरोल आणि बेरोजगारीच्या डेटाकडे लक्ष देत आहेत, फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील दराच्या मार्गावर स्पष्टता शोधत आहेत."
आज सोन्याच्या दरात डॉलरची वाढ झाल्याने घसरण झाली होती. याविषयी बोलताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी विश्लेषण करताना म्हणाले,"सोन्याच्या किमती ४०० रुपयांच्या लक्षणीय अंतराने ६९३०० वर उघडल्या, जे उच्च स्तरावरून नफा बुकिंगमुळे कॉमेक्स गोल्डमध्ये कमजोरी दर्शविते. तथापि, किमतींना त्वरीत आधार मिळाला आणि गमावलेला ग्राउंड परत मिळवला, आठवड्यात २१०० rs ने वाढून ६९७५० वर व्यापार केला. जोपर्यंत मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि व्याजदर कपातीची अपेक्षा फोकसमध्ये राहते तोपर्यंत सोन्याचा सध्याचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे."
आजच्या बँक निफ्टीमधील वाढीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,'आरबीआयच्या धोरणाच्या घोषणेनंतर, बँक निफ्टीने ४८००० च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर राहून आपली मजबूत गती कायम ठेवली. हे पुढील आठवड्यात नवीन सर्वकालीन उच्चांक गाठण्याची शक्यता दर्शविते,कदाचित ५०००० चा टप्पा देखील गाठेल. उल्लेखनीय म्हणजे, आक्रमक पुट लेखन आहे. ४८२००-४८००० झोनमध्ये एक आधारभूत आधार स्थापन करून, कमी स्ट्राइकवर दिसून आले, जे तेजीच्या भावनांसाठी एक उशी म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे."
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलीगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' निफ्टी एका अरुंद श्रेणीत फिरला आणि जवळजवळ अपरिवर्तित संपला म्हणून हे शुक्रवारी निःशब्द सत्र ठरले. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र ट्रेंडने व्यापाऱ्यांना वेठीस धरले ज्यामध्ये रिॲल्टी, एफएमसीजी आणि बँकिंग अव्वल कामगिरी करणाऱ्यांमध्ये होते तर आयटी आणि उर्जेचा व्यापार मंदावला. याशिवाय, मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही ०.५%-०.८% च्या श्रेणीत वाढल्याने व्यापक आघाडीवर सततच्या ट्रेक्शनने भावनांना समर्थन दिले.
कमकुवत जागतिक संकेतांमध्ये निफ्टीमधील अलीकडील एकत्रीकरण वेळोवेळी सुधारणा दर्शवते आणि निफ्टी २२२०० ची पातळी धारण करेपर्यंत व्यापाऱ्यांनी सकारात्मक पूर्वाग्रह राखला पाहिजे. तथापि, सर्व क्षेत्रांमध्ये संमिश्र कल असल्यामुळे प्रचलित परिस्थितीत स्टॉकची निवड करणे अवघड आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्या भागावर अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे. याशिवाय, एखाद्याने ओव्हरबोर्ड जाऊ नये आणि दर्जेदार मिडकॅप आणि स्मॉलकॅप नावांमध्ये पोझिशन्स मर्यादित करू नये.'
निफ्टी विषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, ' "हँगिंग मॅन पॅटर्नच्या निर्मितीनंतर बाजाराच्या ट्रेंडमध्ये विराम दर्शवून, संपूर्ण सत्रात निर्देशांक बाजूला राहिला आहे. दिशात्मक ब्रेकआउट किंवा पॅटर्न फॉर्मेशनच्या अभावामुळे भावना बाजूला राहू शकते.शेवटी,२२६५० ही एक महत्त्वपूर्ण प्रतिकार पातळी असल्याचे सिद्ध होऊ शकते. जोपर्यंत निर्देशांक २२६५० च्या खाली राहतो तोपर्यंत नवीन रॅली अपेक्षित नाही. खालच्या टोकाला, समर्थन २२३०० वर स्पष्ट आहे; उल्लंघन केल्यास, निर्देशांक २२०००-२१९०० श्रेणीच्या दिशेने घसरू शकतो. "
आज रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केलेल्या रेपो दराबद्दल प्रतिक्रिया देताना मोजो पीएमएस मुख्य गुंतवणूक रणनीतीकार सुनिल दमानिया म्हणाले, "आम्ही आरबीआयने आपल्या नवीनतम चलनविषयक धोरणात व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा केली होती, ज्याचे उद्दिष्ट निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय भावना वाढवण्याच्या उद्देशाने होते. तथापि, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अन्नधान्याच्या महागाईच्या वाढत्या लँडस्केपच्या चिंतेचा हवाला देत आरबीआयने यथास्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.महागाईचा दबाव वाढवू शकणाऱ्या भू-राजकीय तणावाबरोबरच. कच्च्या तेलाच्या किमतीत नुकतीच वाढ होऊनही, RBI ने FY २४-२५ साठी ४.५टक्क्यांचा आपला महागाईचा अंदाज कायम ठेवला आहे, जो फेब्रुवारीपासून अपरिवर्तित आहे.
मध्यवर्ती बँक आता कमी महागाई दराची अपेक्षा करते. FY2025 च्या पहिल्या सहामाहीत परंतु उत्तरार्धात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेने मजबूत वाढ दर्शविल्याने, तात्काळ दर कपातीची अत्यावश्यकता कमी झालेली दिसते.प्रचलित जागतिक आर्थिक गतिशीलता लक्षात घेता, हे स्पष्ट आहे की कोणतीही दर कपात पुढे भविष्यात पुढे ढकलली जाऊ शकते.'