पुणे - धनेशाची स्वारी, देशपांडेंच्या दारी; धनेश पक्ष्याने केली कृत्रिम घरट्यात वीण

    22-Apr-2024   
Total Views | 429
pune grey hornbill


मुंबई (अक्षय मांडवकर) -
पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या शैलेश देशपांडे यांच्या घरी भारतीय राखी धनेशाने आपली वीण केली आहे (pune hornbill). देशपांडे यांनी आपल्या सज्जामध्ये (गॅलरी) तयार केलेल्या कृत्रिम घरट्यामध्ये राखी धनेशाने पिल्लाला जन्म दिला आहे (pune hornbill). शहरी भागात सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या या पक्ष्यांनी झपाट्याने बदलणाऱ्या अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न असून नैसर्गिक ढोलींच्या कमतरतेमुळे त्यांनी कृत्रिम घरटी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. (pune hornbill)

भारतीय राखी धनेश हा शहरी अधिवासात सर्वसामान्यपणे आढळणारा पक्षी. मात्र, आता या पक्ष्यांनी शहरी अधिवासातील नैसर्गिक संसाधनांच्या अनुपल्बधतेमुळे मानव निर्मिती संसधानांवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आहे. धनेश प्रजातीचे पक्षी हे झाडाच्या ढोलीत आपली घरटी तयार करतात. मात्र, कोथरुडमधील एमआयटी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या शैलेश देशपांडे यांच्या घरी कृत्रिम घरट्यात धनेशाने अंडी घातली आहेत. देशपांडे यांच्या खिडकीसमोर असणाऱ्या वडाच्या झाडावर राखी धनेश फळे खाण्यासाठी येत असत. त्यामुळे देशपांडे यांनी २०२१ साली आपल्या सज्जामध्ये प्लायवूडच्या लाकडाचे कृत्रिम घरटे तयार करुन लावले. गेली तीन वर्ष यामध्ये साळुंकी पक्ष्याने अंडी दिली. मात्र, यंदा धनेश पक्ष्याने या कृत्रिम घरट्यामध्ये अंडी घातली आहेत. यापूर्वी आम्ही राहत असलेल्या इमारतीमधील एका पाईपमध्ये धनेशाची ही जोडी वीण करत होती. मात्र, यंदा या पाईपमधील पोकळी घर मालकाने बंद केल्याने धनेशाने या कृत्रिम घरट्याची निवड केल्याची माहिती देशपांडे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.



नैसर्गिक वर्तनाप्रमाणेच धनेशाच्या नराने सुरुवातीस कृत्रिम घरट्याची चौकसपणे तपासणी केली. त्यानंतर मादीने घरट्याची तपासणी करुन कृत्रिम घरट्याचे दार केवळ स्वत:ची चोच बाहेर एवढी जागा ठेवून लिंपून घेतले. त्यामध्ये अंडी दिली. या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देशपांडे यांनी कृत्रिम घरट्यात कॅमेरा बसवला आहे. राखी धनेशाच्या या बदलत्या वर्तनाविषयी धनेश संशोधक पूजा पवार यांनी सांगितले की, " शहरी भागात आढळणारे राखी धनेश त्यांच्या झपाट्याने बदलत्या अधिवसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक ठिकाणी त्यांचा मानवी वस्तीतला वावर वाढून त्यांच्या आहारात झालेला बदल नोंदवण्यात आला आहे. चपातीचे तुकडे, गाठीया- शेव, भाताची शिते यांसारखे पदार्थ राखी धनेश खाऊ लागले असल्याचे अभ्यासाकांनी नोंदवले आहे. कृत्रिम घरट्यांचा वापर हा सुद्धा बदलणाऱ्या अधिवासाशी जुळवून घेण्याचा एक पर्याय म्हणून राखी धनेशांनी स्वीकारलेला असू शकतो. अर्थात सखोल अभ्यास करूनच याची पडताळणी करता येईल."


सध्या कृत्रिम घरट्यामध्ये चार अंडी असून एका पिल्लाचा जन्म झाला आहे. मादी आणि पिल्लांसाठी नर हा वड, उंबर, तुती, जांभूळ आणि द्राक्षाची फळे आणत असून नागतोडे, भुंगे यांची देखील मेजवानी सुरू आहे. मी स्वत: पक्षीनिरीक्षक असल्याने त्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. - शैलेश देशपांडे, पक्षीनिरीक्षक

 
घटनाक्रम
- १० मार्च - नराने केली घरट्याची तपासणी
- १६ मार्च - मादीने घरट्याचे दार लिंपण्यास सुरुवात केली
- २० मार्च - मादीने स्वत:ला घरट्यात कोंडून घेतले
- २२ मार्च - मादीने पहिले अंडे दिले
- १८ एप्रिल - पाचपैकी एका अंड्यातून पिल्लाचा जन्म

grey hornbill

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121