मुंबई: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एलोन मस्क दोन दिवसीय दौऱ्यावर भारतात येणार आहेत. व्यवसायिक भेटीसाठी ते दोन दिवस दौरा भारतात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एप्रिल २२ तारखेला सकाळी भेटणार आहेत. त्यानंतर संबंधित उद्योगपती, स्टार्टअप उद्योजक व सरकारी अधिकारी यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
टेस्लाने आपला महत्वाकांक्षी ईव्ही कारचा प्रकल्प भारतात सुरू करण्याचे ठरविले होते. यासंबंधीची अधिकृत घोषणा मस्क भारतात येऊन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत सरकारने टेस्ला प्रकल्पाला भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादक सुरु करण्यासाठी पाचारण केले होते. मोदी व मस्क भेटी मागे या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
टेस्लाने टाटा इलेक्ट्रोनिकस बरोबर अंतर्गत कपोंनटसाठी भागीदारी केली आहे. इलेक्ट्रिक कार बनवताना या पार्टसचा उपयोग जर्मनीतील प्रकल्पात होऊ शकतो. कंपनी इलेक्ट्रोनिक प्रकल्पासाठी भारतात २ ते ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे या शिवाय एलोन मस्क अंतराळ (Space) स्टार्टअपची दिल्लीत भेट घेणार आहेत. याशिवाय विविध उद्योजकांच्या भेटीगाठी मस्क घेऊ शकतात.
आपल्या कुटुंबासह आग्रा येथेही भेट देऊ शकतात. परंतु याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. टेस्ला व्यतिरिक्तही अंतराळ व कनेक्टिव्हिटी साठी भारत सरकार मस्क यांच्याशी चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.