"छत्रपतींच्या गादीच्या सर्वात मोठा अपमान राऊतांनी केलाय!"

नितेश राणेंचा घणाघात

    12-Apr-2024
Total Views | 138
 
Sanjay Raut
 
मुंबई : छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचे पुरावे मागून त्यांचा सर्वात मोठा अपमान संजय राऊतांनी केला आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय मंडलिकांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कसा झाला याबद्दल संजय राजाराम राऊत मुक्ताफळे उधळत होते. पण याच संजय राऊतांनी आमच्या छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागितले होते. म्हणजेच त्यांच्या गादीचा सर्वात मोठा अपमान राऊतांनी केला होता. त्यानंतर ते छत्रपतींना जाऊन भेटले, त्यांना भगवी शाल दिली. त्यावेळी कोल्हापूरचे नेत्यांनी संजय राऊतांना माफी मागायला का सांगितली नाही?"
 
हे वाचलंत का? -  "जसा बॉस शिकवतो तसं..."; श्रीकांत शिंदेंचा पलटवार
 
"ज्यांनी छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागितले त्यांना आम्ही कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, असं वक्तव्यं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी का केलं नाही? तुम्ही जर खरंच छत्रपतींच्या गादीचा आदर ठेवत असाल तर जो नियम तुम्ही संजय मंडलीकांना लावत आहात तोच संजय राऊतांना का लावला नाही?, असा सवाल नितेश राणेंनी कोल्हापूरमधील मविआच्या नेत्यांना केला आहे.
 
तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे म्हणाले की, "आज जवळपास चार वर्षांपासून तुमची काँग्रेससोबत महाविकास आघाडी आहे. पण तुमचे राहूल गांधी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी एकदाही मातोश्रीवर का आले नाहीत? भाजपच्या नेत्यांनी युतीमध्ये असताना मातोश्रीला जो मान दिला तो मान काँग्रेसचं नेतृत्व देतं का?" असा सवाल नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121