भूत उतरविण्यासाठी पाद्रीकडून स्वतःच्या मुलांच्या साथीने चिमुकलीची हत्या!

    10-Apr-2024
Total Views |
girl-tortured-to-death-in-exorcism-in-church


नवी दिल्ली :   
 अमेरिकेत चर्चच्या फादर(पाद्री)कडून आपली मुलगी व मुलासह ३ वर्षांच्या नातवाची हत्या केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 'सैतान'च्या नावाखाली एका १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. या हत्येप्रकरणी मुलीची आई, मामा व आजोबा यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मुलीचे आजोबा चर्चेचे फादर असून त्यांच्याकडे उपचार करण्याची दैवी शक्ती असल्याचा दावा करण्यात येत होता.
 
 
दरम्यान, आपल्या दैवी उपचारांचा वापर मुलीवरील 'सैतान'चा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मुलीला अनेक तास मारहाण करण्यात आली त्यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मुलीचे चर्चचे फादरने आपल्याकडे 'उपचार' करण्याची दैवी शक्ती असल्याचा दावा करत आत्म्यांशी संवाद साधू शकतो. या ‘उपचार’द्वारे मानवाचे कल्याण करतो, असे फादरकडून सांगण्यात आले.

फादरकडून चर्चमध्येच निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर काही तासांत मुलीचा मृतदेह तिथेच टाकून मारेकरी पळून गेले, जेव्हा फादरला वाटले की, मुलगी मेली असून परत आल्यावर फादरला कळून चुकले ती येऊ शकत नाही. चर्चमध्ये भूत काढण्यासाठी मारहाण करत फादरकडून ३ वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. सदर प्रकरणी आता न्यायालयात दैवी शक्तीविरोधात खटला चालविण्यात येत आहे.