"२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे वडिलांना सोडून हॉटेलवर गेले!"

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

    08-Mar-2024
Total Views | 114

Thackeray


कोल्हापूर :
२६ जुलैच्या पुराच्या वेळी उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना सोडून हॉटेलवर गेले होते, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व अन्य उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आल्यावर एकदा मी आलो होतो. त्यावेळी मला इथे माणुसकी पाहायला मिळाली. कोल्हापुरमध्ये एक माळ्यापर्यंत पाणी साचलं होतं. दोन तीन मजले असलेल्या एका घरामध्ये आम्ही गेलो. तिथे एक परिवार तर होताच, पण त्यांची गाय, गुरं आणि पशुधनदेखील त्यांच्यासोबत वरच्या माळ्यावर ठेवलं होतं. किती हे प्रेम? ते एक प्रेम कुठे आणि २६ जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे, याची तुलना होऊ शकत नाही."
हे वाचलंत का? - भाजपनं माडलं सुप्रियाताईंच्या वांग्याच्या शेतीचं गणित! १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन...
 
ते पुढे म्हणाले की, "कोल्हापूरमध्ये फार प्रेमळ लोकं आहेत. इथे एकदा शब्द दिला की, तो पाळणारे लोकं आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये येणारा पूर कायमचा बंद व्हावा आणि इचलकरंजीमध्ये पुराचा त्रास होऊ नये, यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ हजार २०० कोटींचा प्रकल्प आपण करतोय. या प्रकल्पातून हा त्रास कायमस्वरुपी बंद होणार आहे," असेही ते म्हणाले. याशिवाय यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांची माहितीही दिली.



अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंचा युतीबद्दल

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121