‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांना भारतरत्न दिलाच पाहिजे – रणदीप हुड्डा
07-Mar-2024
Total Views |
वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा का? अभिनेता रणदीप हुड्डाने यावर चोख उत्तर दिले आहे.
मुंबई : ‘अखंड भारत’ ही विचारधारा भारतीय नागरिकांना देणारे देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून तो या चरित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार आहे. एखाद्या थोर व्यक्तिमत्वाचा चरित्रपट करणे म्हणजे त्या व्यक्तिची नक्कल न करता त्यांचे विचार आपल्यात सामावून घेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे ही महत्वाची बाब रणदीपच्या अंगी दिसून येते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत रणदीपने वीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांना भारतरत्न देण्यात यावा असे ठामपण म्हटले आहे.
रणदीपला ‘एबीपी न्यूज’ ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयी, सावरकर यांच्या विचारधारेविषयी विचारण्यात आले. तसेच, आत्तापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा ही मागणी बऱ्याचदा करण्यात आली होती. याबद्दल प्रश्न विचारला असता रणदीप म्हणाला, “होय, वीर सावरकरांना भारतरत्न हा पुरस्कार अवश्य मिळायला हवा. माझी इच्छा आहे की लोकांनी हा चित्रपट पाहावा आणि त्यानंतर वीर सावरकर यांना भारतत्न देण्यात यावा आणि यासाठी देशभरातून एक चळवळ उभी राहावी,” असे ठाम मत मांडत आत्मियतेने त्याने मागणी देखील केली.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चरित्रपटात सावरकरांच्या भूमिकेत रणदीप दिसणार आहे. याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारताना त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा मी चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारताना अनुभवली. देशासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो जगासमोर आला पाहिजे याच अट्टहासामुळे मी या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील करण्याचा निर्णय घेतला”
.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, रणदीप हुड्डा, संदीप सिंह आणि योगेश राहर यांनी केली असून रुपा पंडित, सॅम खान, अनवर अली, पांचाली चक्रवर्ती यांनी सह निर्मिती केली आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या प्रमूख भूमिका असणार आहेत.