कॅफेत बॉम्ब ठेवला, मशिदीमध्ये जाऊन कपडे बदलले; NIA च्या हाती लागला मोठा पुरावा

    07-Mar-2024
Total Views | 259
 Bengaluru Blast
 
बंगळुरू : शुक्रवार, दि. १ मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील (Bomb Blast) आरोपींबाबत अधिक माहिती समोर येत आहे. या स्फोटाचा तपास आता एनआयएच्या हाती आहे. एनआयएने स्फोटातील संशयिताचा फोटो जारी करून बक्षीस जाहीर केले आहे. स्फोटातील संशयिताचे बस आणि कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत.
 
बसमधून तो स्फोटाच्या ठिकाणी आला होता, अशी माहिती मिळाली आहे. त्याच्या चेहऱ्याचे तपशीलही स्पष्ट झाले आहेत, त्यात त्याचा चेहरा टोपीशिवाय दिसत आहे. तपास यंत्रणेला त्याची टोपीही एका मशिदीजवळ सापडली. रामेश्वरम कॅफे स्फोट घडवणारा संशयित सकाळी १०:४५ वाजता बसमधून खाली उतरला होता. हा बस स्टॉप कॅफेपासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे.
 
 
कॅफेत बॉम्बची पिशवी ठेवल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बसस्थानकावर जाऊन तेथून बस पकडली. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, संशयित त्याच्या मार्गात एका मशिदीतही थांबला होता. येथे त्याने आपला वेश बदलला आणि आपली टोपी देखील सोडली.
 
एनआयएने ही टोपी जप्त केली आहे. या प्रकरणात हा मोठा सुगावा मानला जात आहे. त्याच्या ८ मिनिटांच्या मुक्कामात त्याने या कॅफेमध्ये हात धुण्याच्या ठिकाणी बॉम्बची बॅग ठेवली. तो आयईडी होता, ज्यामध्ये टायमर होता. संशयित निघून गेल्यानंतर सुमारे एक तासानंतर (१२:५६ वाजता) स्फोट झाला. ज्यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.
 
 
स्फोटात वापरण्यात आलेला बॉम्ब बनवण्यासाठी काही स्फोटके आणि लोखंडी नट आणि बोल्टचा वापर करण्यात आला होता. जेव्हा एखादा स्फोट होतो तेव्हा तो उडून जातो आणि लोकांना दुखापत होतो. मात्र, दहशतवाद्याने ही बॅग ठेवताना चूक केली त्यामुळे त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
संशयिताची ओळख पटवण्यासाठी एनआयएने त्याच्या फोटोसह एक पोस्टर जारी केले आहे. यामध्ये तो कॅप घातलेला दिसत आहे आणि त्याच्या खांद्यावर बॅगही आहे. त्याने काळी पँट आणि राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे. यासोबतच त्याने काळ्या रंगाचे शूज घातले आहेत तर त्याची टोपी क्रीम रंगाची आहे.
 
 
बसमधून काढलेल्या फोटोमध्ये तो टोपीशिवाय दिसत आहे. यावर स्पष्ट नाही पण त्याने टी-शर्ट घातलेला आहे. एनआयएने याबाबत माहिती देणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या शुक्रवारी, दि. १ मार्च २०२४ बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागात असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी स्फोट झाला होता. या स्फोटात ९ जण जखमी झाले आहेत. स्फोटामागील माहिती नंतर समोर आली. यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हापासून या संशयिताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121