लव्ह जिहाद! 'आकाश' बनून 'अनिस'ने केले मुलीचे धर्मांतरण
07-Mar-2024
Total Views |
लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी, दि. ६ मार्च २०२४ लव्ह जिहादच्या प्रकरणात एका मुलीवर बलात्कार आणि धर्मांतराचा आरोपी अनीस अहमद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनीसने आकाश या नावाने आपली ओळख सांगून हिंदू तरुणीशी मैत्री केली होती. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर जबरदस्तीने तिचे धर्मांतरण केले. या प्रकरणात न्यायालयाने अनिसला आरोपी मानत जन्मठेप आणि ४ लाख ६ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
बुलंदशहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीस अहमद हा मूळचा हापूर जिल्ह्यातील आवास विकास कॉलनी येथील रहिवासी आहे. २०२२ मध्ये त्याने आपले नाव बदलले आणि मंगोलपुरी, दिल्ली येथील एका महिलेशी मैत्री केली जिचे लग्न हापूरमध्ये झाले होते आणि नंतर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवले. नंतर अनीसने पीडितेचेही धर्मांतर करून घेतले
पीडितेच्या तक्रारीवरून दि. १५ मार्च २०२२ रोजी गुलावठी पोलिस ठाण्यात अनीसविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ४२०, ३७६(२), ४०६ सह ३/५ धार्मिक धर्मांतर आणि ३(२) ५ SC/ST कायद्यानुसार कारवाई केली. तपासानंतर पोलिसांनी २७ एप्रिल २०२२ रोजी या प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणी पोलिसांनी जोरदार बाजू मांडली होती.
अनीस अहमदविरुद्ध एकूण ५ साक्षीदारांनी साक्ष दिली. शेवटी, दि. ६ मार्च २०२४ रोजी, बुलंदशहरच्या एडीजी विशेष SC/ST न्यायालयाने अनीसला जन्मठेपेची आणि ४ लाख ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. एफआयआरच्या प्रतीमध्ये पीडितेने आपण विवाहित असल्याचे सांगितले होते. आकाशच्या रूपात त्याला भेटलेल्या अनीसने पीडितेला बुलंदशहर येथे आणले. येथे त्यांनी गुलावठी शहरातील हनुमान मंदिराजवळ भाड्याने खोली घेतली. यानंतर अनीसने पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तिने विरोध केला तर तो लग्नाचे आश्वासन द्यायचा.
काही दिवसांनी अनीसची खरी ओळख पीडितेला झाली. पिडीत महिलेला कळले की ती ज्या व्यक्तीला आकाश समजत होती तो प्रत्यक्षात हिंदू नव्हता. तो मुस्लिम असून त्याचे नाव आकाश नसून अनीस आहे. अखेर लग्नाच्या नावाखाली अनीसने पीडितेला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. धर्मांतरानंतर पीडितेचे नाव आयशा ठेवण्यात आले होते.
काही दिवसांनी अनीसने तिला सोडून दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने त्याला फोन करून जाण्याचे कारण विचारले असता अनीसने तिच्यावर जातीवाचक शब्द वापरले. "मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." असे म्हणत अनीसने फोन कट केला. फरार होण्यापूर्वी अनीसने पीडितेकडून अडीच लाख रुपये रोख आणि काही दागिनेही जबरदस्तीने घेतले होते.