नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन तिला गर्भधारणा केल्याप्रकरणी पोलिसांनी शवेझ आलम नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा पर्दाफाश झाला तेव्हा त्याने अल्पवयीन पीडितेशी लग्न केले. मात्र, जेव्हा तिने त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला तेव्हा त्याने तिला तिहेरी तलाक दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी गेल्या दोन वर्षांपासून मुस्तफाबाद परिसरात राहत होती. ती आई आणि भावंडांसोबत राहते. तिच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले. तिची आई देखील आजारी आहे आणि तिच्यावर इहबास हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेने सांगितले की, गेल्या वर्षी शेजारच्या प्रॉपर्टी डीलरने तिच्या कुटुंबाला भाड्याने घर मिळवून दिले होते. यानंतर आरोपी शवेज आलम त्यांच्या घरी येऊ लागला.
आरोप आहे की, दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी मुलगी घरात एकटी होती. दरम्यान, आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने कोणाला काही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. अल्पवयीन पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी दि. १४ ऑगस्ट २०२३ पासून धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. अत्याचारानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली.
गरोदर असल्याचे समजताच पीडितेने शेवेजला माहिती दिली मात्र त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन बाळाचा गर्भपात केला. अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिली, “मी पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीने मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली.” पोलिसांनी सांगितले की, आरोपीने गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी तिला हार्मोन बदलणाऱ्या गोळ्या दिल्या होत्या.
अल्पवयीन पीडितेच्या आईला तिच्या मुलीकडून अत्याचार आणि गर्भधारणेची माहिती मिळाल्यावर तिने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला आमिष दिले आणि दि. १७ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन पीडितेशी “लग्न” केले, परंतु त्याने तिला घरी नेण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीने तिला घरी नेण्यास सांगितल्यावर आरोपी आलम याने तिच्यावर शारिरीक अत्याचार केला आणि दि. २१ जानेवारी रोजी तिची सुटका करण्यासाठी तिहेरी तलाक दिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही आणि त्याऐवजी अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाला धमकावून त्यांना पाठवले. त्यानंतर, दि. ३० जानेवारी २०२४ रोजी त्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधला, परंतु त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी महिला हेल्पलाइनवर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. शनिवार, दि. २ मार्च अल्पवयीन पीडितेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी शवेज आलम याला बलात्कार, पोक्सो, जबरदस्ती गर्भपात, जीवे मारण्याची धमकी आदी आरोपाखाली ताब्यात घेतले.