मुंबई तरुण भारत शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजाराची वापसी निफ्टीत भरघोस वाढ

बीएससी बँक निर्देशांकात देखील जबरदस्त वाढ मात्र बजाज फायनान्स,आयआयएफएल, जेएमडब्लू फायनान्स समभागावर फटका

    06-Mar-2024
Total Views |

stock market
 
मोहित सोमण
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात निफ्टीत जबरदस्त मायलेज मिळाले आहे. बीएससी निर्देशांक ४०८.८६ पूर्णांकांने (०.५५%) वाढत ७४०८५.९९ पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टी ५० निर्देशांक ११७.७५ अंशाने वाढत २२४७४.०५ पातळीवर पोहोचला आहे.बीएससी बँक निर्देशांकात देखील जबरदस्त वाढ झाली आहे. बँक निर्देशांक ५३२.८५ अंशाने वाढत ५४५६६.७४ पातळीवर पोहोचला तर बँक निफ्टी ३८४.४० अंशाने वाढत ४७९६५.४० पातळीवर पोहोचला आहे.सकाळच्या सत्रात संथ सुरूवात झाल्यानंतर बाजारात घसरण मात्र अखेरच्या सत्रात भरून निघाली आहे.
 
याखेरीज बीएससीतील एस अँड पी सेन्सेक्स, सेन्सेक्स ५०, बीएससी १०० बहुतांश निर्देशांकात मोठी वाढ झालेली आहे. बँक निर्देशांकात थेट ०.९९ टक्क्याने वाढ होत एस अँड पी सेन्सेक्स मध्ये ०.५५ टक्क्याने वाढ झाली आहे. बीएससीवरील सर्वाधिक सेन्सेक्स पातळीचा उच्चांक ७४१२९ पर्यंत पोहोचला होता तर शेवटी २३५७९.३८ वर अखेरच्या सत्रात थांबला होता. बीएससीवर १९१ कंपन्यांच्या समभागात (शेअर्स) अप्पर सर्किटवर पोहोचले असून ५१८ कंपन्यांचे समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएससी संकेतस्थळावरील माहितीनुसार, बीएससीवरील कंपन्यांचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ३ अब्ज ९१ लाख कोटींहून अधिक वाढले आहे. एनएनएसवरील कंपन्यांचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) हे ३८९.६६ लाख कोटी इतके होते.सत्र समाप्तीनंतर एनएससीवरील सर्वाधिक पातळी २२४९७.२० पातळीवर गाठली होती. निफ्टीवर बहुतांश निर्देशांक चांगल्याप्रकारे वाढले आहेत.
 
सेक्टोरल इंडायसेसमध्ये ( क्षेत्रीय निर्देशांकात) सर्वाधिक वाढणारा बँक निफ्टी वगळता त्याखालोखाल ऑटो (०.२८ टक्के), निफ्टी फायनाशिंयल सर्विसेस (०.६३ टक्के ), एफएमसीजी (०.४२ टक्के) आयटी (०.७७ टक्के), फार्मा (०.६४ टक्के), पीएसयु बँक निर्देशांकात (०.०४ टक्के) इतकी वाढ झाली आहे. मात्र सर्वाधिक नुकसान मिडिया (२.५४ टक्के) समभागात झाले आहे. त्याशिवाय मेटल(०.५२ टक्के), तेल गॅस (१.०३ टक्के), हेल्थकेअर (०.८४ टक्के) या निर्देशांकात घसरण झाली आहे.निफ्टी कनज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात कुठलाही बदल आज झालेला नाही.
 
एनएससीवर मिडकॅप निर्देशांक व स्मॉलकॅप निर्देशांकात मात्र घसरण झाली आहे. मिडकॅप ०.५२ टक्क्याने व स्मॉलकॅप २.९ टक्क्याने घसरला आहे. बीएससी सेन्सेक्स सर्वाधिक फायदा टाटा केमिकल्स, पिडीलाईट,टीमलीज,संघवी मोटर्स, कोटक महिंद्रा, एक्सिस बँक,भारती एअरटेल,टीसीएस,एचसीएल कंपन्यांच्या समभागावर झाला असून सेन्सेक्स मध्ये सर्वाधिक नुकसान आयआयएफएल,एमजीएल,सीजीएल, जेएम फायनान्स सर्विसेस,अल्ट्राटेक सर्विसेस, मारुती सुझुकी,जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स,पॉवर ग्रीड या समभागात झाले आहे.
 
आज विशेषत एनबीएफसी समभागात गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले परिणामी आयआयएफएल,जेएम फायनांशियल सर्विसेस यांसारख्या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. निफ्टीतील ३५ कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले असून भागभांडवलधारकांनी १५ कंपन्यांचे समभाग नाकारले आहेत.निफ्टीमध्ये सर्वाधिक फायदा बजाज ऑटो,कोटक बँक, भारती एअरटेल,एसबीआय लाईफ, एक्सिस बँक या समभागात फायदा झाला आहे तर अदानी सिमेंट,एनटीपीसी,अल्ट्राटेक सिमेंट,बीपीसीएल,ओएनजीसी या समभागावर घसरण झाली. काल बजाज ऑटो इलेक्ट्रोनिक बाईकच्या घोषणेनंतर बजाज समभाग ३.४३ टक्क्याने वाढले आहेत.
 
अखेरीस युएस प्रति डॉलर तुलनेत भारतीय रुपया ८२.८५ रूपयावर बंद झाला आहे. डॉलर रुपया मूल्यांकनात फारसा फरक पडलेला नाही.एनएससीवर २६८० समभागातील व्यापारात ४४ कंपन्यांचे समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले व २६६ कंपन्यांचे समभाग (शेअर) लो सर्किटवर पोहोचले आहेत‌.आज याशिवाय गोपाल स्नॅक्सचा आयपीओदेखील बाजारात दाखल झाला आहे.
 
४ मार्चच्या अभूतपूर्व सोने दरवाढीनंतर १९७४ नंतर प्रथमच सोने २१२६ डॉलर ग्रॅम किंमतीवर पोहोचले होते‌.आजही सोन्यात दरवाढ कायम असून भारतीय सराफा बाजारात २२ कॅरेट सोने ५९७० प्रति ग्रॅमवर व २४ कॅरेट सोने ६५१३ रूपये प्रति ग्रॅमवर पोहोचले आहे.२४ कॅरेट प्रकारात मुंबईतील सोन्याची किंमत ६५१३० रूपये व २२ कॅरेट प्रकारातील सोने किंमत, ५९७०० रूपये प्रति ग्रॅमवर पोहोचली आहे.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर युरोपीय बाजारात वाढलेल्या औद्योगिकीकरणाचे सकारात्मक संकेत पडत समभाग उसळले होते.युरोपीय समभागात जवळपास ३ टक्क्यांने वाढ होत कच्च्या (क्रुड) तेलाच्या भावात प्रति बॅरेल ०.०८ टक्क्याने वाढ होऊन ८२.६६ प्रति बॅरेल पोहोचलेले होते. बीटकॉइनमधील अखेरच्या उसळीनंतर आज संध्याकाळ पर्यंत ०.४३ टक्क्याने घसरले आहेत.आशियाई बाजारात हेंगसेंग वगळता निकेयी, शांघाय शेअर बाजारात घसरण झाली आहे.
 
अमेरिकेतील डीओडब्लू ,एस अँड पी ५०० व एनएएसडीएक्यू या तीनही बाजारात घसरण झाली. त्यामुळे एनबीएफसीमधील आव्हाने असून देखील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण कायम राहत निफ्टी मोठ्या अंकाने उसळला आहे.चीनच्या सकारात्मक धोरणांचा प्रभाव बीएससी व एनएससीवर दिसून आला आहे. परंतु मिडकॅप स्मॉलकॅप निर्देशांकात झालेली घसरण झाली.युएस फेडरल रिझर्व्ह मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली गेल्याने त्याचाही परिणाम बाजारात जाणवला आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतशी बोलताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'बंद असताना, निफ्टी ११७ अंकांनी किंवा ०.५३ % ने वाढून २२४७४ वर होता आणि सेन्सेक्स ४०७ अंकांनी किंवा ०.५५ % ने वाढून ७४८०५ वर होता.निफ्टी बँक आणि निफ्टी आयटी हे क्षेत्रात अनुक्रमे ०.८१ % आणि ०.७१ ने वाढ केली आहे. निफ्टी बँक निर्देशांक वर ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक,आयसीआयसीआय बँक यांच्यातील तेजी दिसून आली.
 
कच्च्या तेलाचे जगातील दोन सर्वात मोठे ग्राहक असलेल्या चीन आणि युनायटेड स्टेट्समधील वाढत्या मागणीबद्दल चिंता असूनही, प्रमुख उत्पादकांच्या निर्बंधांमुळे मर्यादित पुरवठ्याच्या संकेतांमुळे आज तेलाच्या किमती किरकोळ उसळल्या आहेत.महानगर गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किंमत प्रति किलोग्रॅम २.५ रुपयांनी कमी केल्याच्या एका दिवसानंतर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि महानगर गॅस लिमिटेडच्या भावात आज मोठी घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ओएनजीसी, आणि बीपीसीएल हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले, तर निफ्टी शीर्षस्थानी बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक,ॲक्सिस बँक, भारती एअरटेल आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स या कंपन्यांमध्ये वाढ झाली.'
 
बँक निफ्टीमध्ये आज विक्रमी वाढ झाली अखेरच्या सत्रात झाली होती.निफ्टीवरील आपली नेमकी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रूपक डे म्हणाले, ' निर्देशांकाने संपूर्ण सत्रात अस्थिरता दर्शविली असली परंतु शेवटी मजबूत नोटवर निफ्टी बंद झाला. अल्पकालीन कल सकारात्मक दिसतो, कारण निर्देशांकाने दैनिक ट्रेडिंग चार्टवर 21EMA वरच्या दिवसाचा समारोप केला गेला आहे. याव्यतिरिक्त, संवेग निर्देशक RSI एक तेजीचा क्रॉसओवर दर्शवितो, जी अल्प मुदतीसाठी सकारात्मक गती सूचित करते. जोपर्यंत निर्देशांक २२३५० च्या वर राहतो तोपर्यंत भाववाढ नियंत्रित राहण्याची शक्यता आहे. पुढे पाहता निफ्टी २२६०० आणि २२७०० च्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे."