नवी दिल्ली : बरेली येथील २०१०च्या हिंदूविरोधी दंगलीमागील सूत्रधार म्हणून कट्टरपंथी इस्लामी धर्मगुरू मौलाना तौकीर रझा खान याला घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दरम्यान, या दंगलप्रकरणी कट्टरपंथी मौलाना याला दि. ११ मार्च रोजी समन्स बजावण्यात आले आहेत.
दरम्यान, बरेली हिंदूविरोधी दंगलीबाबत काही अहवालांतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, मुस्लिम जमावाने केलेला हल्ला नियोजित होता, असे काही अहवालांनी सुचवले आहे. “मी हिंदूंच्या रक्ताच्या नद्या वाहीन”, अशा प्रक्षोभक वक्तव्यामुळे ही दंगल उसळली का, याचा न्यायालयाकडून या प्रकरणात विचार करण्यात आला आहे.
हे वाचलंत का? >>> ५ हजार नोकऱ्यांसाठी पणाला लावले 'इतके' कोटी रुपये!
दरम्यान, वर्ष २०१० मध्ये बरेली जिल्ह्यात हिंदूविरोधी दंगली उसळल्या होत्या. ज्यात एक मुस्लिम बरवाफत मिरवणूक जाणूनबुजून हिंदू परिसरातून वळविण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे तब्बल १० दिवसांहून अधिक काळ शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदीनंतरही शहरातील काही भागात इस्लामवाद्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ सुरूच ठेवली.
या प्रकरणात कट्टरपंथी मौलाना तौकीर रझा खानने चिथावणीच्या भाषणात सुरूवातीलाच बारवाफत मिरवणूक प्रशासनाच्या आदेशाविरुद्ध, जातीय घोषणाबाजी आणि हिंदूंवर हल्ला करणाऱ्या सशस्त्र जमावाच्या विरोधात पूर्वनियोजित मार्गावरून वळवण्यात आल्यानेही हे सूचित होते.
बारावाफात मिरवणूक काय आहे
बरेली येथे मिलाद-उन-नबी (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस) दिवशी सुन्नी मुस्लिमांच्या बरेलवी पंथाकडून बारावफत मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत बरेलवींचे सर्वात पवित्र बरेली शरीफ दर्गा किंवा दर्गा-ए- अलहजरत असते. याच मिरवणुकीदरम्यान मुस्लिमांनी अंजुमन नावाच्या छोट्या गटात बरेली शहरातून मोर्चा काढला. प्रत्येक अंजुमनमध्ये सुमारे १००-१५० लोक असतात.