महाएमटीबी शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात आजही उसळण कायम !

निफ्टीत मोठी वाढ सेन्सेक्सही वधारला,आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितींनंतर निफ्टीवरील बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ३९०.४२ लाख कोटी रुपये

    04-Mar-2024
Total Views |

stock market
 
 
मोहित सोमण

मुंबई: आज शेअर बाजारात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निफ्टी, सेन्सेक्स उसळला आहे. काल विशेष सत्रातील मार्केट वधारल्यानंतर आजच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क इंडायसेस (निर्देशांकात) पुन्हा एकदा भरघोस वाढ झाली आहे. निफ्टी ५०,२७.२० अंशाने वाढत २२४०५.६० पातळीवर पोहोचला आहे. बीएससी सेन्सेक्समध्ये ६६.१४ अंशाने वाढत ७३८७२.२९ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टीतील सेक्टोरल (क्षेत्रीय) निर्देशांकात देखील चांगली वाढ पहायला मिळाली आहे. बँक निफ्टीत १५८.६० पातळीने (०.३४ %) ने वाढ होत ४७४५६.१० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी फायनान्स सेवा निर्देशांकातही (०.३८%) ने वाढ होत २०९२७.२५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी मिडकॅप मध्ये ०.५७ टक्क्याने वाढत १४०५६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.३६ टक्क्याने घट होत ७४४०.५५ पातळीवर पोहोचले आहे.
 
 
क्षेत्रीय निर्देशांकात देखील वाढ होत ऑटो, एफएमसीजी, आयटी, मेटल , मिडिया वगळता इतर क्षेत्रात वाढ झाली आहे. निफ्टी मीडिया निर्देशांकात आज सर्वाधिक घट होऊन मिडिया समभाग (शेअर) १.८५ टक्क्याने घसरले आहेत.सर्वाधिक फायदा तेल व गॅस समभागावर झाला. तेल गॅस समभागाचे मूल्य १.८७ टक्क्याने वाढत ११९७२.०० पातळीवर पोहोचले आहे. इतर फार्मा, पीएसयु बँक, फार्मा, खाजगी बँका, रियल्टी क्षेत्रातील समभागात पण फायदा झाला आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील समभागांचे किंचित नुकसान होत ०.१० अंशाने समभागात घसरण झाली आहे.
 
 
आज निफ्टीमध्ये सर्वाधिक उच्चांक २२४४०.९० पातळीवर पोहोचला होता‌. शेवटच्या सत्रात निफ्टी २२४०५.६० पातळीवर बंद झाला आहे. एनएससी संकेतस्थळावरील माहितीनुसार, एकूण निफ्टीवरील २५ कंपन्यांच्या समभागाला गुंतवणूकदारांनी कौल दिला असून मात्र २५ कंपन्यांच्या समभागाला गुंतवणूकदारांनी नाकारले आहे. निफ्टीतील सर्वाधिक फायदा एनटीपीसी, एचडीएफसी,पॉवर ग्रीड, ओएनजीसी, बीपीसीएल या समभागावर झाला असून सर्वाधिक नुकसान आयशर मोटर्स जेएसडब्लू स्टिल, एसबीआय लाईफ, एम अँड एम या समभागावर झाले आहे. एकूण एनएससीत अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार एनएससीवरील कंपन्यांचे बाजार भांडवलीकरण (मार्केट कॅपिटलायझेशन) ३९०.४२ लाख कोटी इतके ठरले आहे.
 
 
अखेरच्या सत्रापर्यंत मात्र युएस डॉलर तुलनेत प्रति रूपयात फारसा बदल झालेला नाही. आज शेवटच्या सत्रानंतर भारतीय रूपया ८२.९० रूपये प्रति डॉलर इतका दर्शविण्यात आला आहे. दुपारनंतर २ पैशाने घसरण होत ८२.९० वर रुपयाची किंमत स्थिरावली होती. बीएससी सेन्सेक्समध्येदेखील तेजी आढळून आली आहे. बीएससी सेन्सेक्स निर्देशांकात अखेरीस ६६.१४ अंशाने वाढत ७३८७२.२९ पातळीवर सेन्सेक्स स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात देखील समाधानकारक वाढ होत तब्बल २०७.६५ अंशाने वाढत बँक सेन्सेक्स ५३९३९.०४ पातळीवर पोहोचला. निफ्टी ५० देखील २९.८४ अंशाने वाढत २३५०६.९१ पातळीवर अखेरच्या सत्रात पोहोचला. दिवसभरात सर्वाधिक सेन्सेक्सची नोंद ७३९९०.१३ पातळीवर झाली होती. सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रीड, रिलायन्स, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा या कंपन्यांच्या समभागाला झाली असून दुसरीकडे मात्र नेसले इंडिया, टीसीएस, टायटन, विप्रो, एशियन पेटंस, आयटीसी या समभागात मात्र गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
 
 
एनटीपीसीने १७१९५.३० कोटी रुपयांचा एनटीपीसी प्रकल्पाला मान्यता मिळाल्यावर या समभागात वाढ झाली आहे. गेल्या ५२ आठवड्यात भेल समभाग १४ टक्क्याने वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळी ४.५० सुमारास ०.४० टक्क्याने घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीविषयी संमिश्र भावना असतानाच आशियाई बाजारात निकेयी, हँगसैग, शांघाय शेअर बाजारात देखील हिरवा कंदील दिसला आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी आपला भारतातील ८१.८७ कोटींची इक्विटी समभाग विकले होते. भारतातील चढ्या बाजारातील इक्विटी गुंतवणूकींचा फायदा परदेशी गुंतवणूकदारांना झाल्यामुळे भारतातील इक्विटीचा बाहेरील देशातील परतावा वाढला होता.
 
 
येणाऱ्या काळात अनेक परदेशी गुंतवणूकीदार भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले होते. गुंतवणूकीतील सकारात्मकतेचा फायदा भारतीय बाजारात दिसला आहे. सेन्सेक्स मध्ये अंशतः वाढ झाली तरी निफ्टीत मोठा फायदा मिळाला आहे.
 
 
आजच्या शेअर बाजारात भाष्य करताना जीओजीत फायनान्सशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,"कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारपेठेने श्रेणीबद्ध पद्धतीने व्यवहार केले, तर व्यापक निर्देशांकांवरील प्रचलित सावधगिरीमुळे गुंतवणूकदार स्टॉक-विशिष्ट वळले. पुढे, कमी वापराच्या डेटाने गुंतवणूकदारांना FMCG आणि विवेकी समभागांपासून दूर राहण्यास प्रभावित केले. जागतिक भावना या आठवड्याच्या शेवटी FED चेअर साक्ष आणि ECB धोरणापूर्वी सावध राहण्याची शक्यता आहे. महागाई लक्ष्य श्रेणीपेक्षा जास्त असल्याने, FED ने व्याजदरांबद्दल आपली बेजबाबदार भूमिका ठेवणे अपेक्षित आहे आणि अधिक संकेतांसाठी बेरोजगारी आणि गैर-फार्म वेतन डेटावर लक्ष ठेवेल.'
 
 
वैश्विक पातळीवरील भाववाढीच्या पार्श्वभूमीवर भारतातील आज सोन्याच्या भावात देखील वाढ झाली आहे. डॉलर निदर्शकांत घट झाली परंतु सोने निर्देशांकात मात्र वाढ झाली आहे. कमोडिटी इंडेक्स निर्देशांकाने आज ८४४३.१० पातळी पार केली आहे. सुरूवातीला सोने निर्देशांकात वाढ झाली असताना संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत सोने एमसीएक्स निर्देशांक ०.०८ अंशाने घसरला. चांदीच्या निर्देशांकात मात्र ०.२७ अंशाने वाढ झाली होती.
 
 
आज बाजारातील सोन्याच्या किंमतीतील हालचालीबाबत बोलताना, एलकेपी सिक्युरिटीजचे वीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' "सोन्याच्या किमती कमी उघडल्यानंतरही सकारात्मक गती दर्शवितात, मध्य सत्रापर्यंत संपूर्ण तोटा भरून काढण्यासाठी मागणी हळूहळू -१६० rs च्या सुरुवातीच्या अंतरावरुन किमती वाढवत होत्या.Comex Gold ला २०८०$ च्या आसपास असाच आधार मिळाला, ज्यामुळे सकारात्मक भावना वाढल्या. गॅप डाउन ओपनिंगनंतर एमसीएक्स गोल्डमध्ये. पुढील महिन्याच्या तुलनेत कमी नॉनफार्म पेरोल डेटाच्या अपेक्षेने समर्थित किमतीचा दृष्टीकोन आशावादी आहे. तथापि, फेडरल रिझर्व्ह चेअरमन पॉवेल यांच्या 6 ला नियोजित केलेल्या साक्षीला प्रतिसाद म्हणून बाजारातील अस्थिरता वाढू शकते. ७ मार्च २०२४, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो."
 
 
आजच्या शेअर बाजारातील स्थितीविषयी प्रतिक्रिया देताना, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' "सोन्याच्या किमती कमी उघडल्यानंतरही सकारात्मक गती दर्शवितात, मध्य सत्रापर्यंत संपूर्ण तोटा भरून काढण्यासाठी मागणी हळूहळू -१६० रूपये च्या सुरुवातीच्या अंतरावरुन किमती वाढवत होत्या. Comex Gold ला २०८० $ च्या आसपास असाच आधार मिळाला, ज्यामुळे सकारात्मक भावना वाढल्या. गॅप डाउन ओपनिंगनंतर एमसीएक्स गोल्डमध्ये पुढील महिन्याच्या तुलनेत कमी नॉनफार्म पेरोल डेटाच्या अपेक्षेने समर्थित किमतीचा दृष्टीकोन आशावादी आहे. तथापि, फेडरल रिझर्व्ह चेअरमन पॉवेल यांच्या ६ ला नियोजित केलेल्या साक्षीला प्रतिसाद म्हणून बाजारातील ६ ते ७ मार्च २०२४ पर्यंत अस्थिरता वाढू शकते, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो."
 
 
शेअर बाजारातील परिस्थितीविषयी बोलताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' बंद होताना, निफ्टी २७.२० अंकांनी किंवा ०.१२ ने वर २२४०५ वर होता आणि सेन्सेक्स ६६.१४ अंकांनी किंवा ०.०९% वर होता तर ७३८७२ पातळीवर होता. निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी एनर्जी हे क्षेत्र होते ज्यांनी आज अनुक्रमे १.८७ % आणि १.७९ % ने वाढ केली आहे. MOIL ने फेब्रुवारी आउटपुटमध्ये १५% YoY वाढ नोंदवली,15 टक्के YoY सह ज्यामुळे शेअर आज ६.६४ % वर बंद झाला. उत्पादनात १.५१ लाख टन मँगनीज (Mn) धातूची वाढ, MOIL ने फेब्रुवारीतील १.५६ लाख विक्रीचा आकडा नोंदवला. सिंगरौली सुपर थर्मलच्या तिसऱ्या टप्प्यासाठी एनटीपीसीने 17,195.3 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिल्याने भेलला फायदा झाला आहे. वीज प्रकल्प ज्यासाठी BHEL ने बांधकामासाठी फक्त बोली लावली होती.आयशर मोटर,जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि ब्रिटानिया हे निफ्टी तोट्यात होते, तर एनटीपीसी, एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन,ओएनजीसी आणि बीपीसीएल या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली.
 
 
आज बँक निफ्टी निर्देशांकात पण चांगली वाढ झालेली आहे. बँक निफ्टीत २०७.६५ अंशाने वाढत सत्र बंद होताना अखेरीस ५३९३९.०४ पातळीवर पोहोचला होता. आजच्या बँक निर्देशांकाबद्दल प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल व डेरिवेटिव्ह एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, ' बँक निफ्टी निर्देशांकाने ताकद राखून आणि ४७००० च्या महत्त्वपूर्ण समर्थन पातळीच्या वर धारण करून लवचिकता दर्शविली, जिथे लक्षणीय मुक्त व्याज पुट बाजूवर केंद्रित आहे. नजीकच्या काळात त्याची सर्वकालीन उच्च पातळी ओलांडण्याची क्षमता असलेला निर्देशांक खरेदी मोडमध्ये आहे. तात्काळ प्रतिकार ४७५०० वर स्थित आहे आणि या पातळीच्या वरच्या प्रगतीमुळे नवीन आजीवन उच्चांकाकडे गती वाढेल."