काँग्रेसचा निषेध

    26-Mar-2024   
Total Views |
Congress Leader's Instagram Post


काँग्रेसी नेत्यांच्या मनात कायमच स्त्रीदेहाची खरेदी-विक्री चालणार्‍या बाजाराचे विचार असतात का? कारण, सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांना भारतीय जनता पार्टीने हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट जाहीर केले. त्यावर काँगे्रसची राष्ट्रीय प्रवक्ता सुप्रिया श्रीनेतने ट्विट केले की, ‘क्या भाव चल रहा हैं मंडी मे कोई बतायेगा?’ तर काँग्रेसचे मुखपत्र ‘नेशनल हेरॉल्ड’ची संपादक मृणाल पांडेने ट्विट केले, ‘शायद यु की मंडीमे सही रेट मिलता हैं.’ काँग्रेस नेता हरीश अहीर याने लिहिले, ‘मंडी से *डी.’ अशी दुर्देवी संतापजनक वक्तव्य करणारे हे काँग्रेसी. आता काँग्रेसने ‘लडकी हू लड सकती हू’च्या प्रचंड अपयशानंतर ‘काँग्रेसी हैं लडकी का चरित्रहनन कर सकते हैं’ असे घोषवाक्य घेऊन निवडणूक लढवावी. व्यक्ती स्त्री असो पुरुष असो की किन्नर, त्याच्या मानवी मूल्यांच्या हक्काला बाधित करण्याचा कुणालाच हक्क नाही. ज्या पक्षाची सर्वेसर्वा एक महिला आहे, त्या पक्षाचे पदाधिकारी एका महिलेसंदर्भात असे कसे बोलू शकतात? कंगनाच्या लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसचा नुसता जळफळाट झाला आहे. तो तसा होण्याचे कारणही आहेच. मागे महाराष्ट्रात काँग्रेसच्या मार्गदर्शनाने चालणारे महाआघाडी सरकार होते. त्यावेळी महाआघाडीच्या विरोधात कंगना राणावतने बेधडक भूमिका घेतली होती. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी, अमली पदार्थविरोधी कंगनाने रान उठवले होते. त्याचवेळी महाआघाडी सरकारची लक्तरे वेशीवर टांगायला सुरुवात झाली होती. तेव्हापासून काँग्रेस, उबाठा गट हे कंगनाच्या विरोधात गेले. पण, मुंबईमध्ये कंगना महाआघाडी सरकारला पुरून उरली, तर अशी कंगना खासदार म्हणून लोकसभेत आली, तर ती उरली सुरली इज्जतसुद्धा काढेल, अशी भीती काँग्रेसला वाटणे साहजिकच. त्यामुळेच की काय, काँग्रेसींनी कंगनाबाबत अशी आक्षेपार्ह विधाने केली. मग काय, भारतीयांनीही कंगनाबद्दलच्या विधानांबाबत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. तेव्हा या काँग्रेसी नेत्यांनी सांगितले की, त्यांनी कंगनाबद्दल असे विधान केले नाही, तर त्यांचे ट्विटर अकाऊंट कुणीतरी हॅक केलेे. अर्थात, त्यांनी काहीही म्हटले तरी त्यांची आणि त्यांच्या काँग्रेसची महिलाविरोधी मानसिकता याआधीही उघडी पडली आहे. नारीशक्तीचा अपमान करणार्‍या काँगेसचा निषेध!
 

महिलाविरोधी काँग्रेस


काँग्रेसी नेत्यांनी कंगना राणावतबद्दल घाणेरडी विधाने केलीच. पण, हे असे अचानक झालेले नाही. या आधीही काँग्रेसच्या नेत्यांनी ऐश्वर्या रॉय आणि स्मृती इराणींबाबत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. महिला म्हंटल की, तिचे शरीर बस. त्या व्यतिरिक्त तिला कसलेच अस्तित्व नाही, अशीच या काँग्रेसवाल्यांची आतापर्यंतची विधाने. त्यामुळेच काँगे्रसचे दिग्विजय काँग्रेसच्याच मिनाक्षी यांच्याबाबत ‘सौ टका टंच माल’ म्हणायला जराही बिचकले नव्हते. कर्नाटक काँग्रेसचा नेता अमरगौडा पाटील याने काय म्हणावे? तर ”तुम्ही एक हट्टाकट्टा पुरुष आणा मी एक बाई देतो. बघा तो एकटा तिच्यावर बलात्कार करू शकेल का? बलात्कारासाठी दोन-तीन पुरुष पाहिजेत.” काय म्हणावे या मानसिकतेला? तर कानपूरच्या काँग्रसी नेता राजाराम पाल याने म्हटले की, ”आमच्या इथे तर दलित महिलांना घरातच नाही, तर बेडरूममध्येही नेतो. एकही दलित महिला नाही, जी आमच्या बेडरूममध्ये आलेली नाही.” काँगे्रेस नेता अधिररंजन चौधरीने काय म्हणावे? तर ”द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती नव्हे, तर हिंदुस्तानच्या त्या राष्ट्रपत्नी आहेत, मग आमच्या का नाहीत?” मागे आसाम युवा काँग्रेसच्या अंगकिता दत्ताने युथ काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बिवीबद्दल आरोप केले की, ”श्रीनिवास लिंगभेद करतो. स्त्री म्हणून तिच्याकडून लैंगिक अपेक्षा करतो.” तिने राहुल गांधी यांच्याकडे तक्रारही केली. मात्र, कारवाई झाली नाही. बाकी पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधींनीही मागे लोकसभेमध्ये महिला खासदारांना फ्लाईंग किस देण्याचा अत्यंत फाजील विकृतपणा केला होताच. आणखी एक अजमेर शरीफ सेक्स स्कँडल आठवते का? यामध्ये ८८ हिंदू मुलींचे जीवन बर्बाद झाले. आठ शाळकरी मुलींनी आत्महत्या केली. या सेक्स स्कँडलचा प्रमुख होता- तिथला युथ काँग्रेसचा अध्यक्ष फारूख चिश्ती, उपाध्यक्ष नफीस चिश्ती आणि अन्वर चिश्ती. अशीही काँगे्रसी शक्तिविरोधी मानसिकता. या मानसिकतेची पावलं कदाचित गांधीजींनी ओळखली होती म्हणूनच ते म्हणाले होते की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करा. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस जळके घर आहे. मात्र, काँग्रेसवाल्यांच्या या विकृत मानसिकतेमुळे वाटते की, काँग्रेस नुसते जळके घर नाही, तर महिलाविरोधी पक्ष आहे.


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.