मी कमळ चिन्हावर लढायला तयार आहे; शिवतारेंचा नविन प्रस्ताव!

    22-Mar-2024
Total Views |
 vijay shivtare
 
पुणे : माजी मंत्री आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay shivtare Baramati )  यांनी मी कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास तयार आहे. असं म्हटलं आहे. हे बंड नसुन मतदारांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी ही निवडणुक लढवत आहे. असंही विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 
 
बारामती लोकसभेत पाच लाख मत आहेत जी पवार घराण्याच्या विरोधातली आहेत. त्या मतदारांना पर्याय म्हणुन मी निवडणुक लढवत असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. मंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी बोलुन बारामतीची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला मागुन घ्यावी अशी विनंती केल्याचं ही शिवतारे यांनी सांगितलं आहे.
 
 
"वेळ पडली तर शिवाजीराव आढळराव पाटील जर घड्याळावर निवडणुक लढवण्यास तयार होवु शकतात. तर धनुष्यबाणावरुन विजय शिवतारे कमळावर जायला अडचण काय" दोनही पक्ष त्याच विचारांचे आहेत असंही ते म्हणाले.
तत्पुर्वी, विजय शिवतारेंना पक्षाकडुन कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्यावर विजय शिवतारेंनी पक्षाने कारवाई केली तरीही माघार घेणार नाही असं म्हटलं आहे.
 
बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडुन सुप्रिया सुळे आणि महायुतीकडुन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची फक्त औपचारीक घोषणाच बाकी आहे. या मतदार संघात नणंद विरुद्द भावजय असा सामना रंगणार आहे. अशा मध्ये विजय शिवतारे यांनी मात्र काही झालं तरी येथुन निवडणुक लढवणार हे निश्चित असल्याचं म्हटलं आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121