"कर्म प्रधान विश्व रचि....", केजरीवालांना जुन्या सहकाऱ्यांचा टोला!

    22-Mar-2024
Total Views |
Arvind Kejriwal ED Arrested
 
 
 
नवी दिल्ली :     दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित दारू घोटाळाप्रककरणी ईडीकडून सदर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईप्रकरणी एकेकाळचे मित्र कवी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांना टोला लगावला आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसमधील या ओळींचा साभार देत "कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करै सो परिणाम चाखा", असे म्हटले आहे.
 
दरम्यान, कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. अण्णा हजारे यांनीदेखील या अटकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझ्यासोबत काम करणारा अरविंद केजरीवालसारखा माणूस, जो आमच्यासोबत दारूविरोधात आवाज उठवायचा, आज दारू धोरण बनवत आहे. मला याचे वाईट वाटते, पण मी काय करू? सत्तेसमोर काहीही करू शकत नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.


हे वाचलंत का? -   दिल्ली उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर केजरीवालांना अखेर ईडीकडून अटक!
 
 
ते पुढे म्हणाले, “अखेर अरविंद केजरीवाल यांना जी अटक झाली, ती त्यांच्या चुकीमुळे झाली. त्यांनी चूक केली नसती तर हे घडले नसते, असे सांगतानाच आता पुढे जे होईल ते कायद्यानुसारच होईल, असेही ते म्हणाले. तर 'आप'च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले कवी कुमार विश्वास यांनीही आपल्या जुन्या सहकाऱ्याची खरडपट्टी काढली आहे. कुमार विश्वास यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसमधील या ओळींचा दाखला देत अरविंद केजरीवाल यांचा समाचार घेतला आहे.

एकेकाळी 'आप'मध्ये असलेले भाजप नेते कपिल मिश्रा यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांचा शेवटचा आश्रय तिहार तुरुंगात असेल असे ते आधीच सांगत होते आणि आजही तेच खरे दिसत आहे. तर दुसरीकडे, 'पक्षातून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आता केजरीवालांच्या समर्थनात आहेत. ही अटक म्हणजे लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा अपहार आहे, असे ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121