मोहित सोमण
मुंबई: इक्विटी बेंचमार्क इंडायसेसमध्ये (निर्देशांकात) आज सुधारणा होऊन बाजार उसळल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने आज व्याजदरात कपात न करता व्याजदर स्थिर ठेवल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम आशियाई बाजारातील गुंतवणूकीत झाला आहे.रेटकट न केल्याने सगळ्या समभागांच्या किंमतीत परिवर्तन झाले आहे.काल सर्वाधिक कोसळलेला मेटल निर्देशांक उसळत आज सर्वाधिक संख्येने वधारला आहे.
सेन्सेक्स निफ्टी निर्देशांकातही मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स ५४५.८३ अंकाने वधारून ७२६९२.२९ पातळीवर पोहोचले असून निफ्टी ५० निर्देशांकात १८३.६५ अंकाने वाढत अखेरीस २२०२२.७५ पातळीवर पोहोचला आहे. अखेरच्या सत्रात बँक निर्देशांकात ३८९.६९ अंशाने वाढ होऊन ५२९७५.३४ पातळीवर पोहोचले आहे.आज अखेर सत्रात सेन्सेक्स निफ्टीत ०.७५ , ०.७४ टक्क्याने वाढ झाली आहे.
एस अँड पी सेन्सेक्स ५० निर्देशांकातही १९०.२७ अंशाने वाढ होत ७२६४१.१९ पातळीवर पोहोचले. बीएससीवर मिडकॅपमध्ये ८९०.२९ अंशाने (२.३६ टक्क्याने) व स्मॉलकॅपमध्ये ८३४.८५ (२.०१ टक्क्याने) वाढ झाली आहे.एनएससीवर(NSE) मिडकॅपमध्ये २.५५ टक्क्याने वाढत व स्मॉलकॅपमध्ये २.३३ टक्क्याने वाढ झाली आहे.
आज सेन्सेक्स (Sensex) बँक निर्देशांकात ३८९.६९ अंशाने वाढ झाली असून बँक निफ्टीत ०.८१ टक्क्याने वाढला आहे. युएस फेडरल रिझर्व्ह बँकचा व्याजदर न बदलल्याने विशेषतः बँकिंग सेक्टरमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले आहे. निफ्टी सेक्टोरल इंडायसेसमध्ये (क्षेत्रीय निर्देशांकात) आज सगळ्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीतच राहिले आहेत.
गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा मेटल (२.४४%) व रियल इस्टेट कंपन्यांच्या (३.०० %) समभागात झाला असून त्यानंतर ऑटो (१.४४ %) बँक (०.८१%), निफ्टी फायनांशियल सर्विसेस (०.८३ %) एफएमसीजी (०.६५ %) आयटी (०.७८ %) मिडिया (२.४४ %) फार्मा (१.२० %) पीएसयु बँक (२.१४%) खाजगी बँका (०.८८ %), हेल्थकेअर (०.९८%) निफ्टी कनज्यूमर ड्युरेबल्स (१.४८%) इतका झाला आहे.
बीएससीवरील ३९२६ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना २७५७ समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली तर १०६४ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे. बीएससीवर ४०६ कंपन्यांचे समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले असून २४५ कंपन्यांच्या समभाग लोअर सर्किटवर पोहोचले आहेत.
एनएससीवरील व्यापार (ट्रेडिंग) केलेल्या २६९२ समभागांपैकी २०५६ समभागांचे मूल्यांकन वाढले असून ५५१ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे. त्यातील २३५ समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले असून ५७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
बीएससीवरील कंपन्यांचे एकूण अधिकृत बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) ३८० कोटींहून अधिक राहिले असून एनएसीवरील एकूण कंपन्यांचे अधिकृत बाजारी भांडवल ३७६.७५ कोटी रुपये इतके होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज रेडीट (Reddit) चा समभाग नोंदणीकृत होणार आहे ज्याची किंमत ३४ डॉलर (युएसडी ) प्रति समभाग सांगितली जात आहे.झॅगल प्रीपेड ओशन कंपनीने आज एक्सप्लीओ ( Expleo) कंपनीबरोबर दोन वर्षांच्या प्रीपेड कंत्राट सुरू केल्याचे घोषित केले त्यामुळे झॅगल ( Zaggle ) कंपनीचा समभाग आज १ टक्क्याने वाढला तसेच टीव्हीएस (TVS) कंपनीने आज १९० कोटींचा लाभांश (Dividend) घोषित केलं ज्यामध्ये प्रति समभाग ९७ रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
याखेरीज अदानी टोटल एनर्जीज व एम अँड एमने एकत्र येत ईव्ही चार्जिंग प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या कंपन्यांचे समभाग आज चर्चेत राहिले आहेत. दिवसभरात सर्वाधिक सेन्सेक्सची पातळी २३१४३.९५ असून निफ्टीवरील सर्वाधिक पातळी २२०८०.८५ इतकी राहिली आहे.
बीएससीवर सर्वाधिक फायदा एनटीपीसी, पॉवर ग्रीड, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, विप्रो,टेक महिंद्रा,आयटीसी,अल्ट्राटेक सिमेंट,बजाज फिनसर्व्ह,एचडीएफसी बँक, एम अँड एम, टायटन, एसबीआय, एक्सिस बँक, रिलायन्स,कोटक महिंद्रा या समभागात झाला असून दुसरीकडे भारती एअरटेल,आयसीआयसीआय बँक, मारूती सुझुकी, एशियन पेटंस या समभागावर नुकसान झाले आहे.
एनएससीवरील गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा एनटीपीसी, बीपीसीएल, टाटा स्टील, इंडसइंड बँक,टाटा मोटर्स, सिप्ला, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, ग्रासीम, आयशर मोटर्स, विप्रो, एम अँड एम,अल्ट्राटेक सिमेंट,बजाज ऑटो या समभागावर होऊन मात्र भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक,एशियन पेटंस, इन्फोसिस या समभागावर गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाची किंमत प्रति डॉलर ८३.१३ रूपयांवर स्थिरावली होती. युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात शक्यता फेटाळली गेल्याने सकाळी भारतीय रुपयात १४ सेंटसी भर होत रुपया वधारला होता. व तुलनेने डॉलरची किंमत घटली होती. सोने चांदीच्या भावातही आज भरघोस वाढ पहायला मिळाली.फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्थिर व्याजदराने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ होत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति ग्रॅम सोन्याच्या भावात अंदाजे १००० रूपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावातही प्रतिकिलो २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोनाच्या भावात झालेल्या भाववाढीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली, सोने ६५७५० वरून सुमारे १२०० रुपयांनी वाढून ६६९४० च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आणि सकाळच्या व्यापारात चांदी ७८००० रुपयांनी वाढली परंतु फेडरल रिझर्व्हच्या व्याज राखण्याच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून सरासरी ट्रेडिंग १३०० रुपयांनी ७६४००० वर दर अपरिवर्तित राहिले आहेत. घोषणेनंतर, किमती $२१५७ वरून $२२१७ पर्यंत वाढल्या, ज्यामुळे $५३ ची लक्षणीय वाढ झाली.
ही तेजी फेड चेअर जेरोम पॉवेल यांच्या डोविश समालोचनाने चालविली गेली, ज्यांनी तीन दर कपातीची शक्यता दर्शविली. पॉवेलने व्यवस्थापनाच्या महत्त्वावर जोर दिला चालू असलेल्या भू-राजकीय आव्हानांना न जुमानता आर्थिक स्थिरतेशी तडजोड न करता मे २०२३ पासून ताळेबंद घटण्याचा वेग कायम ठेवण्याच्या फेडच्या निर्णयामुळे यूएस अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि श्रमिक बाजारपेठेतील मजबुतीवर विश्वास आणखी दृढ झाला. MCX मध्ये, सोन्याला $६६००० च्या आसपास समर्थन मिळू शकते $६६७०० च्या आसपासच्या वर्तमान स्तरांवरून काही नफा बुकिंगनंतर चिन्हांकित करा."
एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) वर सोन्याच्या व चांदीच्या निदर्शकांत अनुक्रमे १.५७ व १.३५ टक्क्याने वाढ झाली आहे. एमसीएक्सवर क्रूड तेलाच्या किंमत निर्देशांकातही ०.०३ टक्क्यांची घट दाखवली गेली आहे. WTI Index (वेस्ट टेक्सास इन्स्ट्रुमेंट) निर्देशांकातही क्रूड मधली घट ०.२० टक्क्याने कायम राहिली आहे तर ब्रेट फ्युचर निर्देशांकात ०.२० टक्क्याने घसरण झाली आहे. एमसीएक्सवर क्रूड (कच्च्या तेलाच्या) किंमत प्रति बॅरेल ६७४७ रूपये झाली आहे.
क्रूड विषयी प्रतिक्रिया देताना जे एम फायनांशियल सर्विसेसचे ईबीजी उपाध्यक्ष प्रणव मेर म्हणाले, '" मागील सत्रांतून कच्च्या तेलाच्या किमती सावरल्या गेल्या आणि आतापर्यंतच्या व्यवहारात सकारात्मकता दिसून आली, कमकुवत यूएस डॉलर आणि यूएस मधील इंधन आणि तेलाच्या मालमत्तेमध्ये सतत होणारी घट यामुळे - उच्च मागणी सूचित करते, तर पुरवठा समस्या आणि उत्तरार्धात उच्च मागणीची अपेक्षा वर्षाने भावना सकारात्मक ठेवल्या आहेत.तांत्रिकदृष्ट्या, ६७३० -६६९०वर वरील समर्थनापर्यंत कल सकारात्मक राहतो, तर चढत्या किमतींमध्ये ६९००-७०००० स्तरांची चाचणी घेण्याची क्षमता आहे."
सकारात्मक जागतिक निर्देशकांचाही देशांतर्गत बाजारातील भावावर परिणाम झाला. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीनंतल कोरियाचे कोस्पी आणि जपानचे निक्केई सारख्या प्रमुख आशियाई निर्देशांकात 2 टक्क्यांनी वाढ झाली होती. याशिवाय देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवणूक वाढविल्याने त्याचा फायदा लार्ज कॅप समभागात झाला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
आज बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला भाष्य करताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' आज निफ्टी ०.७९ % ने २२०११ वर सकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स ०.७५ % ने ७२६४१ वर बंद झाला. निफ्टी रिॲलिटी आणि निफ्टी मेटल अनुक्रमे ३.०% आणि २.४४ % ने वाढले. CY24 मध्ये घसरलेल्या दरात मागच्या बातम्यांमुळे मेटल क्षेत्रात आशावाद आला आहे कारण घसरणारा दर आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाच्या सक्रियतेस समर्थन देईल.
बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स आज आशावादाने भरले होते, बाजारातील खेळाडूंनी फेडच्या ठळक टिप्पणीचे कौतुक केले आणि जूनपासून सुरू होणाऱ्या या वर्षी तीन वेळा दर कमी होऊ शकतात. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दिसलेल्या मजबूत वाढीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास व्यापक होता. FOMC च्या ५.२५-५.५ % श्रेणीत व्याजदर राखण्याच्या निर्णयानंतर, यूएस डॉलर घसरला.
दरम्यान, फेड चेअर जेरोम पॉवेल, २०२४ मध्ये तीन दर कपात करण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या अंदाजासाठी ते वचनबद्ध असल्याचे दिसते. त्यांनी २०२४ साठी १.८ % वरून २.१ % पर्यंत वाढीचा अंदाज अद्यतनित केला. बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्राइड, टाटा स्टील, कोल इंडिया हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर भारती एअरटेल, एचडीएफसी लाइफ, ओएनजीसी, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक सर्वाधिक तोट्यात होते.
आजच्या शेअर बाजारातील स्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' अमेरिकन फेड रिझर्व्हने कालच्या केलेल्या २०२४ मधे व्याज दरात कपात होऊ शकेल अशा प्रकारच्या कोॅमेटरीमुळे बाजारात सकारात्मक परिणाम झाला. आज या मीटिंग मधे व्याजदर "जैसे थे ठेवले" आहेत .पण प्रत्यक्षात हे अमेरिकन व्याज कमी होण्याकरीता CPI (Consumer Price Index) कधी कमी होईल त्यावर ही दर कपात अबलंबुन असणार आहे
रिलायन्स,एचडीएफसी बँक, एसबीआय आणि मेटल शेअरनी बाजाराला पाठिंबा दिला आहे.हळूहळू मिडकॅप व स्माॅलकॅप ही समस्या कमी होत जाईल पण मार्केट करेक्शन सुरू राहील. अधूनमधून अशा रॅली अपेक्षित असतातच त्याने बाजार स्थिर राहतो. भारतीय सकल देशांअंतर्गत उत्पादन (GDP) ६ ते ८ % ने सकारात साईड राहीलच हे जो पर्यंत नक्की आहे तोपर्यंत मोठं काही नकारात्मक घडणार नाही असे वाटते.'
आजच्या बँक निफ्टवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, '"गॅप-अप स्टार्टनंतर बँक निफ्टी अस्थिर राहिला. अलीकडील एकत्रिकरणाच्या वर निर्देशांक फुटल्यामुळे सेंटिमेंट सुधारले. दैनिक चार्टवर, निर्देशांकाने किंचित उंच पातळी तयार झाली, ज्यामुळे मंदी कमी झाल्याचे सूचित होते. अल्पावधीतच, निर्देशांक कमी होऊ शकतो.४७००० कडे गुंतवणूकदार हलवू शकतात व ४७००० च्या पुढे निर्णायक वाटचाल केल्यास ते ४७७०० कडे जाऊ शकते. खालच्या टोकाला समर्थन ४६३०० वर स्थित आहे."
बाजारातील स्थितीविषयी विश्लेषण करताना, रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, 'अनुकूल जागतिक संकेतांचा मागोवा घेत बाजाराने जोरदार वाढ केली आणि जवळपास एक टक्क्याने वाढला. गॅप-अप स्टार्ट झाल्यानंतर, निफ्टी शेवटपर्यंत एका अरुंद श्रेणीत फिरला आणि शेवटी २२०११.९५ स्तरावर स्थिरावला. सर्व प्रमुख क्षेत्रांनी या वाटचालीत भाग घेतला ज्यामध्ये रिॲल्टी आणि मेटल सर्वाधिक लाभधारक होते.व्यापक निर्देशांकांनीही जोरदार पुनरागमन केले आणि प्रत्येकी ~२.५ % वाढले.
यूएस बाजारातील तेजी निर्देशांकाला केवळ नुकसान भरून काढण्यास मदत करत नाही आणि त्यादरम्यान पुन्हा उलाढाल सुरू करते.बेंचमार्क आघाडीवर,निफ्टीने आज शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच २० EMA च्या तात्काळ अडथळ्याची चाचणी केली पण ती पार करू शकली नाही.आम्ही आता काही एकत्रीकरण पाहू शकतो आणि कोणतीही अर्थपूर्ण पुनर्प्राप्ती चिन्हांकित करण्यासाठी २२२०० वरील स्थिरतेची आवश्यकता आहे. दरम्यान, पुढील दिशात्मक हालचालींबाबत स्पष्टता दिसेपर्यंत सहभागींनी स्टॉक-विशिष्ट राहावे आणि इंडेक्स मेजर आणि लार्ज मिडकॅप्ससह चिकटून राहावे.'