‘दृष्यम’ चित्रपटाची सातासमुद्रापार झेप, हॉलिवूडमध्ये होणार रिमेक!
29-Feb-2024
Total Views | 48
निशिकांत कामत दिग्दर्शित 'दृष्यम' चित्रपटाची परदेशात नवी झेप. हॉलिवूड चित्रपटसृष्टीत बहुमान मिळवणारा ठरला पहिला चित्रपट
मुंबई : करोना काळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची अधिक आवड प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या चित्रपटांचे कथानक, विषय इतके प्रेक्षकांना भावले की हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक आणि लेखकांनी त्या चित्रपटांचे रिमेक देखील केले. असाच एक गाजलेला दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे 'दृष्यम' (Drishyam) चित्रपट. मराठमोळा दिग्दर्शक निशीकांत कामत याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेतली असून या चित्रपटाचा रिमेक हॉलिवूडमध्ये केला जाणार आहे. अभिनेता अजय देवगण ( Ajay Devgan) याची प्रमुख भूमिका असलेल्या दृष्यमवर आता हॉलीवूडचे मेकर्स चित्रपट तयार करणार आहेत. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार याबाबत पनोरमा स्टुडिओजने गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जॉट फिल्मसोबत करार केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हॉलिवूडमध्ये रिमेक होणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून 'दृष्यम' चित्रपटाला मान मिळाला आहे. यापूर्वी अनेक भारतीय चित्रपटांचे इंग्रजीत डबिंग करण्यात आले होते. मात्र रिमेकचा पहिला बहुमान दृष्यमला मिळाल्याने आनंदी वातावरण आहे.
दृष्यमची लोकप्रियता ही जगभरात असून यापुर्वी या चित्रपटाचा कोरिअन रिमेक झाला असून तो देखी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे सांगण्यात येते.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, असे देखील सांगितले जात आहे की, हॉलिवूड रिमेकसोबतच या चित्रपटाचे स्पॅनिशमध्येही डबिंग केले जाणार आहे. ‘दृष्यम’चा पहिला भाग १९ डिसेंबर २०१३ रोजी तर ‘दृष्यम २’ २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे आता अजय देवगण, तब्बू, इन्सपेक्ट गायतोंडे यांच्या भूमिका हॉलिवूडचे कोणते कलाकार निभावणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.